Satyaprem Ki Katha Box Office : सत्यप्रेम की कथा बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात ; पण चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 20% वाढ

Box Office Collection Of Satyaprem Ki Katha : सत्यप्रेम की कथा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपले स्थान टिकविण्यात यशस्वी होत आहे
Satyaprem Ki Katha Box Office Collection
Satyaprem Ki Katha Box Office Collection Saam Tv
Published On

Satyaprem Ki Katha 4th Day Box Office Collection : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा 'सत्यप्रेम की कथा' शुक्रवार ऐवजी गुरुवारी प्रदर्शित झाला. गुरुवारी बकरी ईद असल्याने देशाबाहेरच्या असलेल्या या सुट्टीचा फायदा घेत चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. निर्मात्यांचा या चित्रपटाच्या कामावर काय परिणाम झाला पाहूया.

मराठमोळे दिग्दर्शक समीर विद्वंस यांचा सत्यप्रेम की कथा हा दिग्दर्शनातील पहिला हिंदी आहे. या चित्रपटामध्ये एक प्रेमकथा दाखविण्यात आली आहे. या प्रेमकथेला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. हा चित्रपट हळूहळू का होई ना कमाई करत आहे आणि चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे दिसत आहे. (Latest Entertainment News)

Satyaprem Ki Katha Box Office Collection
Saisha Bhoir Get Replace : आई - वडिलांमुळे साईशा भोईरचे करियर धोक्यात ? मालिकेतून झाली रिप्लेस

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे विश्लेषण ट्विट केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे, #SatyaPremKiKatha चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपले स्थान टिकविण्यात यशस्वी होत आहे. शनिवार आणि रविवार या दिवसांचे कलेक्शन पाहूया… गुरुवार 9.25 कोटी, शुक्रवार 7 कोटी, शनिवार 10.10 कोटी, रविवार 12.15 कोटी. एकूण: ₹ 38.50 कोटी कलेक्शन या भारतात केले आहे.

मुसळधार पावसाचा मुंबईतील कमाईला फटका बसला आहे. तर सत्यप्रेम की कथा चित्रपटाला पंजाबी चित्रपट #CarryOnJatta3 चा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या दिल्ली आणि पंजाबमधील व्यवसायावर परिणाम होत आहे. तरीही चित्रपट बॉक्सऑफिसवर इतिहास रचताना दिसत आहे. ()

सत्यप्रेम की कथा चित्रपटाला या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर टिकून राहावे लागेल, ते खूप आवश्यक आहे… याचा फायदा म्हणजे, पुढील काही आठवडे मोठे चित्रपट प्रदर्शित होणार नाहीत, त्यामुळे हा एकमेव चित्रपट बॉक्स ऑफिसवर असणार आहे. त्यामुळे चित्रपटाला फायदा होऊ शकतो…

#SatyaPremKiKatha वाढ / घट…

शुक्रवार : [घट] 24.32% - सुट्टीनंतरचा चालू दिवस

शनिवार : [वाढ] ४४.२९%

रविवार : [वाढ] 20.30%

पोस्ट कोविड अनेक दिग्गज कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरले. पण कार्तिक आर्यन हा एकमेव अभिनेता होता ज्याचे चित्रपट बॉलिवूडच्या वाईट काळातही हिट होत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com