Satish Kaushik Dance: सतीश कौशिकचा होळी पार्टीतील व्हिडिओ, मित्रांसोबत मनसोक्त केला डान्स

विकास मल्लूने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Satish Kaushik Dance Video
Satish Kaushik Dance VideoSaam TV

Satish Kaushik Dance Video:बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार आणि निर्माते सतीश कौशिक यांचे ९ मार्च २०२३ रोजी निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले आहे. बॉलिवूड स्टार्स आणि त्यांच्या मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांना गुरुग्राममध्ये झालेल्या होळी पार्टीत काही आक्षेपार्ह औषधांची पाकिटे सापडली, त्यामुळे सतीश कौशिक यांचा मित्र विकास मल्लू याच्यावर सोशल मीडियावर आरोप करण्यात आला. पण आता विकास मल्लूने एक व्हिडिओ शेअर केला आहे, हा व्हिडिओ त्याच होळीच्या पार्टीचा आहे ज्यात सतीश सहभागी झाले होते.

Satish Kaushik Dance Video
Biopic In Bollywood: आर्यन खान प्रकरणातील हिरो समीर वानखेडेवर येणार बायोपिक

सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस चौकशी व तपास करत आहेत. आरोपांनंतर विकास मल्लूने यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सतीश कौशिक डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत.

व्हिडिओ शेअर करताना विकास मल्लूने यांनी लिहिले आहे की, "सतीश जी गेल्या 30 वर्षांपासून माझे कुटुंब आहेत आणि जगाला माझे नाव चुकीच्या प्रकरणात गोवण्यासाठी काही मिनिटेही लागली नाहीत. आमच्या एकत्र खूप सुंदररित्या होळीचा सण साजरा केला आणि ही शोकांतिका घडली हे मी समजू शकत नाही.

मला शांतता बोलायचे आहे, एक शोकांतिका नेहमीच अनपेक्षित असते आणि त्यावर कोणाचाही अधिकार नसतो. यासह मी मीडियाच्या सदस्यांना विनंती करू इच्छितो की त्यांनी सर्वांच्या भावनांचा आदर करावा. सतीशजी नेहमीच प्रत्येक वेळी आम्हाला आठवत राहतील.

सतीश कौशिक यांचे मॅनेजर संतोष यांनी पोलिसांना सांगितले की, 8 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत होळी साजरी केली आणि नंतर विश्रांतीसाठी गेले. 12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी मॅनेजरला फोन केला, त्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com