Satish Kaushik दिसणार 'या' अखेरच्या चित्रपटात, साकारणार दिग्गज राजकारण्याची भूमिका

सतिश निधनानंतर एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सर्वत्र त्या चित्रपटाचा बोलबाला होत आहे.
Satish Kaushik Emergency Film
Satish Kaushik Emergency FilmInstagram

Satish Kaushik Emergency Film: 'कॅलेंडर', 'पप्पू पेजर', 'मनु मुंद्रा' यांसह अनेक चित्रपटांत सतिश कौशिक यांनी बहुआयामी भूमिका साकारल्या. बॉलिवूड इंडस्ट्रित सतिश कौशिक यांची ओळख एक बहुआयामी कलाकार म्हणून सर्वत्र आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराच्या तिव्र झटका आल्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. सतिश कौशिक यांच्या चाहत्यांना त्यांचे निधन झाले असल्याच्या वृत्तावर अजुनही विश्वास बसत नाही.

सोशल मीडियावर चाहते आजही त्यांची आठवण पोस्टच्या माध्यमातून करीत आहे. सतिश निधनानंतर एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सर्वत्र त्या चित्रपटाचा बोलबाला होत आहे.

Satish Kaushik Emergency Film
Satish Kaushik demise: सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं नेमकं कारण आलं समोर

सतिश कौशिक यांचा 'इमर्जंसी' (Emergency)चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. सध्या सर्वत्रच या चित्रपटाची चर्चा होत आहे. कंगना रणौतने 28 सप्टेंबर 2022 रोजी सतीश कौशिक यांच्या भूमिकेचा पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केला होता. या चित्रपटात सतीश संरक्षण मंत्री जगजीवन राम यांची भूमिका साकारणार असल्याचे दिग्दर्शकांनी सांगितले. जगजीवन राम भारताच्या राजकारणातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक होते.

या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे, मात्र अद्याप त्याची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटात कंगना राणौत, मिलिंद सोमण, महिमा चौधरी, अनुपम खेर, विशाक नायर आणि श्रेयस तळपदे यांच्याही भूमिका आहेत. सोबतच 'छत्रीवाली' चित्रपटातही सतिश कौषिक प्रमुख भूमिकेत होते.

कंगना रणौत सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणते, " या गंभीर बातमीने मला जरा धक्काच बसला. सतीश माझ्या आयुष्यातील चीयरलीडर होते. एक यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून मी त्यांच्याकडे आजही पाहते, सतीश कौशिक खासगी आयुष्यात खूप दयाळू होते. ते एक खरा माणूस म्हणून सर्वांनाच कायम लक्षात राहतील. 'इमर्जंसी'च्या वेळी त्यांना दिग्दर्शन करून मला आनंद झाला. त्यांची आठवण येईल.." ओम शांती अशा शब्दात कंगनाने तिच्या भावना व्यक्त केल्यात.

अभिनयच नव्हे तर लेखक, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका साकारत सतीश कौशिक यांनी प्रेक्षकांमध्ये आपले स्थान पक्के केले. त्यांचा जन्म १३ एप्रिल १९६५ रोजी हरियाणात झाला. बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्यांनी अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. १९८७ मध्ये मिस्टर इंडिया या सिनेमातील कॅलेंडर या भूमिकेतून त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com