Saif Ali Khan : बॉलिवूडच्या 'नवाब'चा थाटच न्यारा; मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी, आकडा पाहून फिरतील डोळे

Saif Ali Khan Buy Property : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने नुकतीच मंबईत प्रॉपटी खरेदी केली आहे. किती कोटींमध्ये डील झाली, जाणून घेऊयात.
Saif Ali Khan Buy Property
Saif Ali KhanSAAM TV
Published On
Summary

सैफ अली खानने मुंबईत प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

नवीन प्रॉपर्टी मुंबईत अंधेरी येथे विकत घेतली आहे.

कोट्यवधींमध्ये व्यवहार झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बॉलिवूडचे अनेक कलाकार रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात. अशात आता सैफ अली खानने देखील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. सैफने नुकताच मुंबईत प्रॉपर्टी खरेदी सैफने मुंबईत दोन कार्यालय खरेदी केली आहेत. ही प्रॉपर्टी तो भाड्याने देणार असल्याचे बोले जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सैफ अली खानने दोन्ही कार्यालये मुंबईतील अंधेरी पूर्वे येथे खरेदी केली आहेत. अंधेरी येथे कनकिया वॉल स्ट्रीट येथे आहे. या दोन्ही कार्यालयांची एकूण किंमत 30.75 कोटी रुपये आहे. स्टाम्प ड्युटी 1.84 कोटी आणि नोंदणी शुल्क 60,000 आहे. एकूण क्षेत्रफळ 5,681 चौरस फूट आहे. कार्यालयांमध्ये 6 कार पार्किंग आहेत. हा करार 18 नोव्हेंबरला अधिकृत झाला. ही प्रॉपर्टी यूएसमधील औषध कंपनी एपियोर फार्मास्युटिकल्सने विकली.

2025 मध्येच सैफ अली खानने एप्रिल महिन्यात दोहा, कतार येथे एक हॉलिडे होम खरेदी केले. आजकाल कलाकारांचा रिअल इस्टेट गुंतवणुकीकडे जास्त कल वाढताना दिसत आहे. सैफ अली खानला इंडस्ट्रीमध्ये नवाब म्हणून ओळखले जाते. सैफकडे हरियाणातील पतौडी पॅलेस, मुंबईतील आलिशान बंगला मिळून करोडोची मालमत्ता आहे. सैफच्या नावावर इलुमिनाटी फिल्म्स आणि ब्लॅक नाइट फिल्म्स असे दोन प्रॉडक्शन हाऊस आहेत.

सैफ अली खान आता 'हैवान' (Haiwan) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात सैफ अली खानसोबत अक्षय कुमार झळकणार आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. तब्बल 18 वर्षांनी अक्षय कुमार आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) एकत्र काम करणार आहेत. 'मैं खिलाडी तू अनाडी', 'टशन', 'तू चोर मैं सिपाही' यांसारख्या चित्रपटात अक्षय कुमार आणि सैफ अली खानने एकत्र काम केले आहे.

Saif Ali Khan Buy Property
Prajakta Mali : प्राजक्ता माळी अन् गश्मीर महाजनीने दिली गुडन्यूज, चित्रपटाबाबत सांगितली महत्त्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com