Emotional Post For Jayant Savarkar : तुम्ही आम्हाला खूप काही दिलं... रुपाली भोसलेची 'आई कुठे काय करते'च्या तात्या मामांसाठी भावुक पोस्ट

Rupali Bhosale On Jayant Savarkar Death : जयंत सावरकर आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेचा भाग होते.
Rupali Bhosale Post For Jayant Savarkar
Rupali Bhosale Post For Jayant Savarkar Saam TV

Rupali Bhosale Share Emotional Post For Jayant Savarkar :

नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार त्यांच्या जाण्याने शोक व्यक्त करत आहेत.

जयंत सावरकर आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेचा भाग होते. या मालिकेतील अभिनेत्री रुपाली भोसले म्हणजेच संजनाने पोस्ट करत जयंत सावरकर यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

जयंत सावरकर आई कुठे काय करते मालिकेत कांचेच्या मोठ्या भावाची भूमिका साकारत होते. अधून-मधून ते मालिकेत दिसायचे. एका भागात संजना म्हणजे रुपाली भोसलेने त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. तो सीन पोस्ट करत रुपालीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Latest Entertainment News)

Rupali Bhosale Post For Jayant Savarkar
Aai Kuthe Kay Karte Update (25 July): अनिरुद्ध नाही तर अरुंधतीच लग्नातला मोठा अडथळा, ईशाचा झालाय गैरसमज?

रुपालीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचे निधन.. आण्णा, भावपूर्ण श्रद्धांजली. जेव्हा जेव्हा ते 'आई कुठे काय करते'च्या शूटला यायचे, तेव्हा ते आम्हा सर्वांना खूप आशीर्वाद आणि खूप पॉसिटीव्हिटी यायचे.

मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांना नमस्कार केला. त्यांनी भरपूर आशीर्वाद तर दिलेच पण त्याचबरोबर माझ्या कामाचं खूप कौतुक सुद्धा केलं. आपली सिरीयल आणि आपलं काम ते बघतायेत हे ऐकून खरंच खूप खूप छान वाटलं.

तसेच जबाबदारी अजून वाढली याची जाणीव झाली. अण्णा तुम्ही खूप काही दिलं आम्हाला, सगळ्या कलाकारांना खूप काही शिकवलत. तुम्ही शेवटपर्यंत काम करत होतात आणि त्याच एनर्जीने म्हणून तुमच्यासोबत केलेला सीन पोस्ट करत आहे.

जयंत सावरकर यांनी अनेक नाटक मालिका आणि चित्रपटामध्ये काम केले आहे. जयंत सावरकर यांनी वायाच २०व्या वर्षांपासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 'एकच प्याला'मधील तळीराम, 'तुझे आहे तुजपाशी'तील आचार्य, 'व्यक्ती आणि वल्ली'मधील अंतू बर्वा आणि हरितात्या या त्यांच्या गाजलेल्या भूमिका आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com