Ranbir Kapoor Donate 10,000 Adipurush Movie Tickets: 'द काश्मिर फाईल्स' चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी त्यांच्या सोशल मीडियावर जाहीर आदिपुरुषची 10,000 तिकिटे तेलंगणामधील वंचित मुले आणि वृद्धाश्रमांना दान करणार आहेत.
भूषण कुमार निर्मित ओम राऊत दिग्दर्शित, प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान यांच्या आदिपुरुष चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 16 जून 2023 रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. रणबीर कपूरनेही रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाला पाठिंबा देणार असल्याचे पिंकविलाला सांगितले आहे. (Latest Entertainment News)
रणबीर कपूर बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. रणबीरने एक मोठे पाऊल उचलत आदिपुरुष चित्रपटाला पाठिंबा दर्शविला आहे. रणबीरने देशभरातील गरीब मुलांना चित्रपटाची 10,000 तिकिटे दान करणार आहे.
रणबीर स्वत: लहानपणी रामायणातून बरेच काही शिकले आहे आणि आता आजच्या पिढीतील मुलांनी श्री रामाच्या कथेतून शिकावे अशी त्याच्या इच्छा असल्याचे त्याने पिंकविलाशी 10,000 तिकिटे स्वयंसेवी संस्थांना देणार आहे.
आदिपुरुषच्या निर्मात्यांनी पिंकविलाच्या या बातमीचे पुष्टी केली आहे. सहकारी अभिनेते या चित्रपटाला समर्थन देत असल्याचे पाहून त्यांनी आनंद देखील व्यक्त केला आहे. आदिपुरुष आतापर्यंतच्या सर्वात महागड्या भारतीय चित्रपटांपैकी एक आहे. आदिपुरुषबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट 500 कोटी रुपयांच्या प्रचंड बजेटमध्ये बनला आहे आणि तो जगभरात 2D आणि 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे.
आदिपुरुषसाठी ऍडव्हान्स बुकिंग आठवड्याच्या शेवटी सुरू होईल. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भारतीय रिलीझपैकी एक असेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, रणबीर भूषण कुमार निर्मित संदीप रेड्डी वंगा यांच्या अॅनिमलच्या रिलीजची तयारी करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत.
विशेष म्हणजे, रणबीर स्वत: नितेश तिवारीच्या रामायणात आलिया भटसह सीतेच्या भूमिकेत प्रभू रामाची भूमिका साकारण्याची तयारी करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.