Tu Jhoothi Main Makkaar 11th Day Box Office Collection
Tu Jhoothi Main Makkaar 11th Day Box Office Collection Instagram @shraddhakapoor

'पठान' नंतर ‘Tu Jhoothi Main Makkaar’ १०० कोटींच्या क्लबमध्ये; अवघ्या आठवड्यातच केली छप्पर फाड कमाई

Box Office and Ranbir Kapoor: ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये १०० कोटींचा आकडा पार केला आहे.

Tu Jhoothi Main Makkaar 11th Day Box Office Collection: रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. दुसरा आठवडा मात्र या चित्रपटासाठी फारसा चांगला नव्हता. परंतु वीकेंडला मजल मारत या चित्रपटाने १०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा चित्रपट ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये १०० कोटींचा आकडा पार केला आहे. दुसऱ्या आठव्यातील शनिवारी चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवार पेक्षा डब्बल कमाई केली आहे.

Tu Jhoothi Main Makkaar 11th Day Box Office Collection
Malaika Arora: मलायका अर्जुनसोबत एन्जॉय करतेय प्री-हनिमून; ‘प्रत्येक गोष्टीचा शेवट लग्न नसतो’ म्हणत स्पष्ट केलं मत

सैकलिनच्या रिपोर्टनुसार ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाने शुक्रवारी या चित्रपटाने ३,५० कोटीची कमाई केली आहे. तर शनिवारी या चित्रपटाने ६ कोटी रुपये कलेक्शन केले आहे. चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन १०२. २१ कोटी रुपये आहे.

लव रंजन दिग्दर्शित ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट कोविड नंतर सातवा चित्रपट आहे ज्याने १०० कोटीचा आकडा पार केला आहे. तसेच १०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणार आहे यावर्षीचा दुसरा चित्रपट ठरला आहे. अनेक दिग्गज कलाकारांना बॉक्स ऑफिसवर अपयशाचा सामना करावा लागला आहे. मात्र पठाननंतर बॉक्स ऑफिसवर रणबीरचा ‘तू झूठी मैं मक्कार’ यशस्वी ठरला आहे.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. स्टॅन्ड अप कॉमेडियन अनुभव बस्सीने या चित्रपटातून पदार्पण केले आहे. त्याचा अभिनयाचे देखील प्रेक्षक कौतुक करत आहेत. बोनी कपूर आणि डिंपल कपाडिया देखील या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com