Tu Jhoothi Main Makkar: 'तू झूठी मैं मक्कार' चित्रपटाला झटका; रणबीर-श्रद्धाचा चित्रपट प्रदर्शित होताच झाला लीक

'तू झूठी मैं मक्कार' चित्रपट प्रदर्शित होताच ऑनलाईन लीक.
Tu Jhoothi Main Makkaar Leaked Online
Tu Jhoothi Main Makkaar Leaked Online Instagram @shraddhakapoor

Tu Jhoothi Main Makkar Leaked Online: रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार' आज म्हणजे ८ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे. लव रंजन दिग्दर्शित या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिस चांगली कामगिरी करेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. परंतु या चित्रपटासंबंधित एक वाईट बातमी समोर आली आहे.

प्रदर्शित होताच हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. हाती आलेल्या अहवालानुसार, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासातच लीक झाला आहे. तमिलरॉकर्स, फिल्मीजिला, मूवीरुलेजसारख्या वेबसाईटवर चित्रपट अनधिकृतरित्या उपलब्ध झाला आहे. 'तू झूठी मैं मक्कार' चित्रपट एचडी क्वालिटीमध्ये अनेक वेबसाईटवर उपलब्ध झाला आहे.

Tu Jhoothi Main Makkaar Leaked Online
Ranbir Kapoor Interview: आमच्या पोटावर लाथ मारू नका..., बॉयकॉट बॉलिवूडवर रणबीर कपूरने दिली प्रतिक्रिया

180p, 720p, 480p, 360p, 240p आणि एचडी अशा विविध पिक्सलमध्ये वेबसाईटवर उपलब्ध झाला हे. चित्रपट प्रदर्शित होऊन काहीच तास झाले आहेत. काही तासात चित्रपट लीक झाल्याने निर्मात्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या एकूण कलेक्शन परिणाम होईल असे म्हटले जात आहे.

चित्रपटाची एचडी प्रिंट कुठून चोरण्यात आली हे अद्याप समजलेले नाही. चित्रपटाची इतकी चांगली प्रिंट चोरी होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासात लीक झाले आहेत.

शाहरुख खानचा 'पठान', 'दृश्यम २' सारखे अनेक चित्रपट लीक झाले आहेत. परंतु लीक झाल्यानंतर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर त्याचा परिणाम झाला नाही. 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटावर याचा किती परिणाम होते हे येत्या काळात सर्वांसमोर येईलच.

'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन लव रंजन केले आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय बोनी कपूर आणि डिंपल कपाडिया देखील या चित्रपटात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. हा चित्रपट 50 ते 70 कोटींच्या बजेटमध्ये बनविण्यात आला आहे. अॅडव्हान्स बुकिंग पाहता पहिल्या दिवशी चित्रपट चांगली कमाई करेल असा अंदाज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com