Ramayan Film: ‘रामायण’मधून आलियाचा पत्ता कट?, सितेच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री

Talks Of Dropping Alia From Ramayana Movie: आलिया ‘रामायण’ चित्रपटात सितेची भुमिका साकरणार नसल्याचं बोललं जात आहे.
Who Will Be Ranbir Kapoor's Sita In Nitesh Tiwari's Ramayana
Who Will Be Ranbir Kapoor's Sita In Nitesh Tiwari's RamayanaSaam TV

Who Will Be Ranbir Kapoor's Sita In Nitesh Tiwari's Ramayana: गेल्या काही दिवसांपूर्वी ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाला. प्रदर्शनपूर्वी तुफान चर्चेत राहिलेला चित्रपट प्रदर्शनानंतर कमाईच्या बाबतीत खूपच सपाटून मार खालला. कधी कथेमुळे, कलाकारांच्या लूकमुळे तर कधी व्हिएफएक्समुळे हा चित्रपट चर्चेत राहिला. अशातच आणखी एक चित्रपट कलाकारांमुळे चर्चेत आला आहे. तो चित्रपट म्हणजे ‘रामायण’. या चित्रपटात आलिया आणि रणबीर अशी चर्चा सुरू झाली, तेव्हापासूनच चित्रपटावर ट्रोलिंगचा वर्षाव व्हायला लागला.

Who Will Be Ranbir Kapoor's Sita In Nitesh Tiwari's Ramayana
Salman Khan Smoking News: इतरांना शिकवतो आणि स्वतः सिगारेट ओढतो, भाईजान झाला ट्रोल

गेल्या काही दिवसांपूर्वी नितेश तिवारी दिग्दर्शित चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर सिंह सीता आणि रामाच्या भूमिकेत दिसणार म्हणून चित्रपटाला नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केलं होतं. नुकतंच चित्रपटाविषयी एक नवीन माहिती समोर आली आहे, मोठ्या वादानंतर आता आलियाने या चित्रपटातून काढता पाय घेतला. आलिया या चित्रपटात सितेची भुमिका साकरणार नसल्याचं बोललं जात आहे. आता या बातमीने आलियासह रणबीरच्या देखील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

काही मीडिया रिपोर्टनुसार, ‘रामायण’च्या निर्मात्यांनी आता आलियाच्या ऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला घेतलं असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. निर्मात्यांनी चित्रपटात साऊथची परमसुंदरी साई पल्लवीला चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता चित्रपटात रणबीर रामाच्या तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Who Will Be Ranbir Kapoor's Sita In Nitesh Tiwari's Ramayana
Kiran Mane Post: ‘पण सातारा म्हणजे...’ ‘सातारच्या बच्चन’ने लिहिली खास साताऱ्यासाठी पोस्ट

मिळालेल्या माहितीनुसार, निर्माते या वर्ष अखेरीपर्यंत चित्रपटाची शूटिंग सुरू करणार असल्याची माहिती मिळत आहे. ‘रामायण’ची अधिकृत घोषणा दिवाळीच्या मुहूर्तावर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘रामायण’चे निर्माते अल्लू अरविंद, मधु मंतेना आणि नमित मल्होत्रा हे असून दिग्दर्शक नितेश तिवारी आहेत. रणबीर कपुर सध्या ॲनिमल चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचा या चित्रपटातील पहिला लूक देखील प्रदर्शित झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com