Arvind Trivedi Death: रामायणातील 'रावण' अरविंद त्रिवेदी यांचे निधन

लोकप्रिय रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अभिनेता अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले आहे.
Arvind Trivedi Death: रामायणातील 'रावण' अरविंद त्रिवेदी यांचे निधन
Arvind Trivedi Death: रामायणातील 'रावण' अरविंद त्रिवेदी यांचे निधनSaam Tv
Published On

मुंबई: लोकप्रिय रामायण Ramayana Serial मालिकेत रावणाची Ravan भूमिका साकारणारे अभिनेता अरविंद त्रिवेदी Arvind Trivedi passes away यांचे निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. अरविंद त्रिवेदी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. त्यांचा भाचा कौस्तुभ त्रिवेदी यांनी अरविंद त्रिवेदी त्यांच्या निधनाचु पुष्टी केली. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकलाकारांनी देखील अरविंद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

रामा अर्थात रामायणातील अभिनेते अरुण गोविल यांनी ट्वीट केले- 'आध्यात्मिक आणि सांसारिकदृष्ट्या अत्यंत थोर, धार्मिक, साध्या स्वभावाचे व्यक्ती आणि माझे प्रिय मित्र अरविंद त्रिवेदी जी यांना आज मानव समाजाने गमावले आहे. यात काही शंका नाही की, ते थेट परमार्थात जातील आणि त्यांना भगवान श्री रामाचा सहवास मिळेल.

सुनील लाहिरी यांनी अरविंद त्रिवेदीचे दोन फोटो शेअर केले आणि ट्वीट केले- 'अत्यंत दुःखद बातमी आहे की, आमचे लाडके अरविंद भाई (रामायणातील रावण) आता आपल्यात नाहीत. त्याच्या आत्म्याला शांती लाभो ... माझ्याकडे शब्द नाहीत, मी एक वडील, माझा मार्गदर्शक, हितचिंतक आणि सज्जन व्यक्ती गमावला आहे. '

300 हिंदी-गुजराती चित्रपटांमध्ये काम केले

अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील Madhya Pradesh उज्जैन शहरात झाला. गुजराती रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी अनेक वर्षे गुजराती चित्रपटात योगदान दिले. गुजराती प्रेक्षकांमध्ये त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तसेच उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सन्मानितही करण्यात आले. अरविंद त्रिवेदींनी किमान 300 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त अरविंद त्रिवेदी यांनी राजकारण क्षेत्रातही नशीब आजमावले होते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com