राज कुंद्राला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा; मात्र सुटका नाही

मुंबई उच्च न्यायालयाने राज यांना या प्रकरणात अटक करण्यापासून 25 ऑगस्टपर्यंत अंतरिम संरक्षण म्हणजेच तात्पुरता दिलासा दिला आहे.
राज कुंद्राला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा; मात्र सुटका नाही
राज कुंद्राला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा; मात्र सुटका नाही Saam Tv

नवी दिल्ली: शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील व्हिडिओ Pornography बनवल्याबद्दल आणि प्रकाशित केल्याप्रकरणी अटक केली आहे. 19 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली होती. सध्या राज कुंद्रा न्यायालयीन कोठडीत आहे. उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीनंतर राज कुंद्राला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज यांना या प्रकरणात अटक करण्यापासून 25 ऑगस्टपर्यंत अंतरिम संरक्षण म्हणजेच तात्पुरता दिलासा interim protection दिला आहे. कुंद्राच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 25 ऑगस्टला म्हणजेच बुधवारी होणार आहे. परंतु यानंतरही तो तुरुंगातून बाहेर येणार नाही.

हे देखील पहा-

राज कुंद्राला दिलासा;

मुंबई सायबर पोलिसांनी वर्ष २०२० मध्ये दाखल केलेल्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने Bombay High Court राज कुंद्राला तात्पुरता दिलासा दिला आहे. कुंद्राविरोधात वेब सीरिजचा भाग म्हणून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अश्लील व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप तक्रारीत होता. पोर्नोग्राफी Pornography प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने Mumbai Crime Branch एक विशेष तपास पथक तयार केले होते. मुंबई पोलिसांनी कुंद्राला मुख्य सूत्रधार मानले आहे. तर या प्रकरणात त्याची पत्नी, मॉडेल गेहाना वशिस्ट आणि शर्लिन चोप्रासह अनेकांची चौकशी करण्यात आली आहे.

राज कुंद्राला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा; मात्र सुटका नाही
झोपेतून अचानक जागे झाल्यावर, शरीर हालचाल करू शकत नाही? जाणून घ्या असे का होते

मुंबई पोलिसांकडे अनेक पुरावे;

महाराष्ट्र सायबर पोलिसांना Cyber branch राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे मिळाले होते. मुंबई गुन्हे शाखेने 48 टीबी डेटा जप्त केला होता. ज्यात दोन अॅप्सवरून 51 अश्लील चित्रपट जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच त्याने राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांच्या अटकेचे कारणही सांगितले होते. व्हॉट्सअॅप ग्रुप आणि चॅट डिलीट केले जात असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. यासह, पुरावे नष्ट केले गेले होते, ज्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने राज आणि शिल्पाच्या कार्यालयांवर तसेच एकापेक्षा जास्त वेळा छापे टाकले आहेत. छाप्यात, पोलिसांनी पुरावे म्हणून सर्व्हर, व्हिडिओ क्लिप आणि व्हॉट्सअॅप चॅट देखील जप्त केले होते. कुंद्रा व्यतिरिक्त, कंपनीचे कार्यकारी उमेश कामत आणि नातेवाईक प्रदीप बक्षी यांचीही अश्लील चित्रपट निर्मिती आणि त्याच्या वितरणाच्या बाबतीत चौकशी सुरू आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com