मुंबई: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रा संबंधित दोन अॅप्समधून ५१ पोर्नोग्राफिक फिल्म जप्त केल्या. यानंतर राज कुंद्रा Raj Kundra आणि त्यांचा सहाय्यक रायन थोर्पे Ryan Thorpe यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप आणि चॅट्स डिलीट करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे पुरावे नष्ट करण्यास त्यांनी सुरुवात केली आणि त्यामुळे पोलिसांना त्यांना अटक करावी लागली. अशी माहिती सरकारी वकील अरुणा पै. Adv. Aruna Pai यांनी शनिवारी ता. ३१ जुलै मुंबई हायकोर्टात दिली आहे.
हे देखील पहा-
कुंद्रा आणि थोर्पे यांनी पोलिसांना तपासात मदत करण्याऐवजी व्हॉट्सअॅप ग्रुप्स, चॅट्स डिलीट करायला सुरुवात केली. ते पुरावे नष्ट करण्यासाठी धडपडत होते. आरोपी जेव्हा पुरावे नष्ट करायला सुरुवात करतात तेव्हा तपास यंत्रणा मूक साक्षीदार बनून राहू शकत नाही. आरोपींना तसे करण्यापासून प्रतिबंध करणे अत्यावश्यक असते. म्हणूनच पोलिसांनी अटक केली कारण आरोपींच्या कृतींना प्रतिबंध करावी लागते. स्पष्टीकरण अरुणा पै यांनी मुंबई हायकोर्टात Bombay HC दिले आहे.
बॉली फेम Bollyfame आणि हॉटशॉट Hotshot या अॅप्समधून पोलिसांनी ५१ पोर्नोग्राफिक फिल्म्स Pornographic Films जप्त केल्या आहेत. अरुणा पै यांनी माहिती दिली की, त्याशिवाय कुंद्रा यांचा पर्सनल लॅपटॉप, मोबाईल फोन आणि स्टोरेज एरिया नेटवर्क डिव्हाइसमधूनही आणखी काही फाइल्स जप्त करण्यात आल्या आहेत. या माहितीनंतर वकील पै यांनी दिल्यानंतर न्या. ए. एस. गडकरी यांच्या पीठाने हा खटला पुढील सुनावणीपर्यंत स्थगित केला.
पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने सोशल मिडियावर दिली प्रतिक्रिया;
पती राज कुंद्रा याच्या अटकेनंतर प्रथमच शिल्पा शेट्टीने सोशल मिडियावर समोर येऊन प्रतिक्रिया दिली की, माझ्या संदर्भात अनेक चुकीच्या बातम्या चालविल्या जात आहे. माझी कुणाविषयी तक्रार नाही. मी कुणालाही प्रतिक्रिया देणार नाही. मुंबई पोलिस आणि न्यायालयावर माझा विश्वास आहे. न्यायासाठी आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबू, मी एक आई म्हणून मुलांची जबाबदारी माझेवर आहे. आपल्याला विनंती आहे. मी भारतीय आहे, मागील २९ वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. माझावर विश्वास ठेवा मी कुणाचाही विश्वास घात केला नाही. माझ्या कौटुंबिक प्रायव्हसीबाबत मिडिया ट्रायल करू नका अशी विनंतीही तिने केली आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.