Praveen Kumar Sobti: महाभारतातील ‘भीम’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते प्रविण कुमार यांचे निधन

बीआर चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेमध्ये 'भिम' ही भूमिका साकारणारे अभिनेता प्रवीण कुमार सोबती यांचे निधन झाले आहे.
Praveen Kumar Sobti: महाभारतातील ‘भीम’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते प्रविण कुमार यांचे निधन
Praveen Kumar Sobti: महाभारतातील ‘भीम’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते प्रविण कुमार यांचे निधनSaam Tv
Published On

मुंबई: बीआर चोप्रा यांच्या महाभारत (Mahabharat) या मालिकेमध्ये 'भिम' (Bhima) ही भूमिका साकारणारे अभिनेता प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti) यांचे निधन झाले आहे. दिल्ली मधील अशोक विहार येथे राहत्या घरी प्रवीण कुमार सोबती यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते ७४ वर्षाचे होते. अनेक दिवसापासून ते आजारी होते. त्यांना पाठी दुखीची समस्या जणवत होती. काही महिन्याअगोदर त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यांची कन्या निपुणिकाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराचा झटका आला होता.

हे देखील पहा-

पंजाबमधील तरणतारण हे प्रवीण कुमार सोबती यांचे मूळ गाव होते. त्यांच्या महाभारत या मालिकेत 'भिम' या भूमिकेला प्रेक्षकानी पसंती दिली होती. त्यांच्या फिटनेसमुळे ते नेहमी चर्चेत होते. फिटनेसमुळे त्यांना चित्रपट आणि मालिकांमधील बॉडीगार्ड किंवा गुंडाच्या भूमिकेच्या काम येत होते. फिटनेसमुळे त्यांना भिम ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.

Praveen Kumar Sobti: महाभारतातील ‘भीम’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते प्रविण कुमार यांचे निधन
OBC Reservation : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळणार? आज निर्णय अपेक्षित

प्रवीण कुमार सोबती यांनी ३० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याअगोदर ते हॅमर आणि डिस्कस थ्रो एथलीट होते. एशिशन गेम्समध्ये त्यांनी २ गोल्ड मेडल पटकावले होते. तसेच त्यांनी २ सिल्व्हर आणि १ ब्रॉन्झ मेडल देखील त्यंनी पटकावले होते. त्यांनी १९६८ मधील मॅक्सिको ऑलिम्पिक्स आणि १९७२ मधील म्यूनिख ऑलिम्पिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व देखील केले होते. तसेच ते बीएसएफचे जवान देखील होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com