Prabhas Wedding: सुपरस्टार प्रभास लवकरच अडकणार लग्न बंधनात? 'या' मुलीशी जोडले नाव

Bollywood News: साऊथचा सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. प्रभास लवकरच लग्न बंधनात अडकणार? अशी चर्चा सुरू आहे.
Prabhas
प्रभास लवकरच अडकणार लग्न बंधनात? 'या' मुलीशी जोडले नावactorprabhas
Published On

चित्रपटातील कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच इंटरनेटवर चर्चेचा विषय राहते. जर ते त्यांच्या लग्नाबद्दल किंवा प्रेम जीवनाबद्दल असेल तर ते आणखी चर्चेचे राहते. साऊथचा सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. होत असलेल्या चर्चेनुसार, तयाच्या कुटुंबाने हैदराबादमधील एका व्यावसायिकाच्या मुलीशी त्याचे नाते निश्चित केले आहे. परंतु, आता प्रभासच्या टीमने याप्रकरणी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत.

हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, प्रभासच्या टीमनं म्हटलं आहे की, ही बातमी खाटी आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करा. वास्तविक, न्यूज १८ तेलगूच्या वृत्तानुसार, अभिनेत्याच्या कुटुंबाने हैदराबादच्या एका मोठ्या व्यावसायिकाच्या मुलीशी त्याचे नाते निश्चित केले आहे. पण ती काय करते याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. इतकचं नाही तर हे लग्न पूर्णपणे गुप्त असू शकते.

Prabhas
Prabhas: ४५ वर्षांचा प्रभास लवकरच करणार बिझनेसमॅनच्या मुलीसोबत लग्न; नेमकं सत्य काय?

प्रभास त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याचे नाव दक्षिणेकडील अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबतही जोडले गेले आहे. परंतु या विषयी दोघांपैकी कोणीही आजपर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाही. याशिवाय प्रभासचे नाव कृती सेननसोबतही जोडले गेले. मिडीया रिपोर्टनुसार, आदिपुरुष चित्रपटावेळी दोघेही जवळ आले होते. या बद्दलही ते कधी बोलले नाहीत.

या चित्रपटांमध्ये दिसणार प्रभास

प्रभास 'द राजा साब', 'फौजी' आणि 'कन्नप्पा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यापूर्वी, प्रभासने २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या कल्की २८९८ एडी चित्रपटात दिसला होता. यामध्ये प्रभाससोबत अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिपीका पदुकोण देखील दिसले होते.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com