Happy Birthday Mani Ratnam: मणिरत्नम यांना ‘भारताचे स्टिव्हन स्पिलबर्ग’ का म्हणतात?, यामागं आहे ‘ही’ कारणं...

Mani Ratnam Why He Is Called Steven Spielberg Of India- मणिरत्नम यांना भारताचे ‘भारताचे स्टिव्हन स्पिलबर्ग’ का म्हणतात? असं अनेकदा आपल्याला प्रश्न पडला असेल, चला तर जाणून घेऊया त्या मागील कारण...
Mani Ratnam Why He Is Called Steven Spielberg Of India
Mani Ratnam Why He Is Called Steven Spielberg Of IndiaSaam Tv
Published On

Ponniyin Selvan Director Mani Ratnam Birthday: दाक्षिणात्य सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचा आज ६७ वा वाढदिवस. मणिरत्नम यांनी १९८३ मध्ये 'पल्लवी अनु पल्लवी' या कन्नड चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मणिरत्नम यांनी आतापर्यंत 5 भाषांमध्ये 28 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त मणिरत्नम यांनी आतापर्यंत प्रेक्षकांना PS1 आणि PS2 सारखे काही हिट चित्रपट दिले. मणिरत्नम यांना भारताचे ‘भारताचे स्टिव्हन स्पिलबर्ग’ का म्हणतात? असं अनेकदा आपल्याला प्रश्न पडला असेल, चला तर जाणून घेऊया त्या मागील कारण...

Mani Ratnam Why He Is Called Steven Spielberg Of India
Tiger 3 Set Video Leaked: अखेर दिसलेच..! ‘टायगर ३’ च्या शुटींगसाठी 'पठान' आणि 'टायगर' एकत्र; व्हिडीओ होतोय व्हायरल

दाक्षिणात्य दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटाची नेहमीच चर्चा होत राहते. मणिरत्नम आणि स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या चित्रपटाला एक वेगळेच व्हिजन असल्यामुळे दोघांच्याही चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चर्चा होते. दिग्दर्शक नेहमीच दुरदृष्टीचा विचार करत असल्यामुळे त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. दोघेही त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच प्रॅक्टिकल विचार आणि आपल्या चित्रपटासंबंधित सर्वच बाजूंचा विचार करत चित्रपटाची शूटिंग करतात. दोन्ही दिग्दर्शकांचे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांना फारच आवडतात.

आपला चित्रपट हिट होणार की फ्लॉप, याची दोन्ही दिग्दर्शकांना काळजी नसते. हे दोन्ही दिग्दर्शक चित्रपट बनवताना कधीच नवीन कौशल्यासंबंधित कोणतीही तडजोड करत नाही. सोबतच शूटिंग दरम्यान देखील आपल्या कौशल्यांचा वापर करत ते चित्रपटाची शूटिंग करतात. मणिरत्नम यांची क्रिएटिव्हीटी बघायची असेल तर, ‘छैय्या छैय्या’ हे गाणं पाहा. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले असून गाणं प्रदर्शित झाल्यानंतर हे आयकॉनिक गाणे बनले. म्हणूनच मणिरत्नम यांना ‘भारताचे स्टिव्हन स्पिलबर्ग’ म्हणतात.

Mani Ratnam Why He Is Called Steven Spielberg Of India
Tejashri Pradhaan News: काय सांगता..! तेजश्रीच्या डोक्यावर अक्षता पडणार.. शुभमंगल होणार..

मणिरत्नम हे अशा प्रथितयश दिग्दर्शकांपैकी एक आहेत ज्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा अनेक भारतीय भाषांमध्ये चित्रपट बनवले आहेत. ह्या पद्मश्री पुरस्कार प्राप्त दिग्दर्शकांना रोजा, बाँबे, इरूवर, दिल से.., आणि कन्नाथील मुथामित्तल अशा अनेक चित्रपटांसाठी ओळखलं जातं. नायकन आणि अंजली या दोन्ही चित्रपटांना भारताकडून अधिकृत प्रकारे ऑस्करसाठी पाठवले होते. येणाऱ्या काळात मणिरत्नम आणि कमल हसन एकत्र येणार असून त्यांचा हा आगामी चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. (Bollywood Film)

IMDb वरील मणिरत्नमची सर्वाधिक रेटिंग असलेली टॉप 10 चित्रपट

1. नायकन - 8.6

2. थालापती - 8.5

3. कन्नाथील मुथामित्तल - 8.4

4. इरूवर - 8.4

5. मौना रागम - 8.4

6. अलाईपेयुथे - 8.3

7. गीतांजली - 8.3

8. अंजली - 8.2

9. बाँबे - 8.1

10. रोजा - 8.1

Director Mani Ratnam Top 10 Film
Director Mani Ratnam Top 10 FilmSaam Tv

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com