मोदींनी पाठवलेल्या पत्राने अक्षय कुमार भावुक, म्हणाला ''हे शब्द नेहमी...''

अक्षय कुमारचं सांत्वन करण्यासाठी त्याला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी पत्र लिहिलं आहे. त्याने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
मोदींनी पाठवलेल्या पत्राने अक्षय कुमार भावुक, म्हणाला ''हे शब्द नेहमी...''
मोदींनी पाठवलेल्या पत्राने अक्षय कुमार भावुक, म्हणाला ''हे शब्द नेहमी...''Saam Tv News
Published On

बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार याची आई अरुणा भाटीया यांचं काही दिवसांपुर्वीच निधन झालं होतं. त्याच्या आईच्या जाण्याने तो अतिशय दुःखी होता. देशभरातील त्याचे चाहते त्याला सोशल मीडियावरुन धीर देत होते. त्यामुळे अक्षय कुमारने सर्वांचे आभार देखील मानले होते. आता अक्षय कुमारचं सांत्वन करण्यासाठी त्याला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी पत्र लिहिलं आहे. त्याने पंतप्रधान मोदींचं हे पत्र त्याच्या इंस्टाग्राम पेजवरुन शेयर करत मोदींचे आभार मानले आहेत. (pm modi sent letter to akshay kumar for Consolation)

हे देखील पहा -

मोदी पत्रात काय म्हणाले?

पीएम मोदींनी पत्रात लिहिले - "बरीच मेहनत आणि संघर्ष केल्यानंतर तुम्हाला यश मिळाले. तुम्ही मोठे नाव कमावले आणि तुमच्या समर्पणाने प्रसिद्धी मिळवली." पंतप्रधानांनी पत्रात असेही म्हटले आहे की, अभिनेता म्हणून, अक्षयने मिळवलेले यश त्याच्या पालकांना नेहमीच अभिमान वाटेल. मोदींच्या या पत्रानंतर अक्षय कुमार भावुक झाला आणि त्याने मोदींंचे आभार मानत लिहिलं की, "माझ्या आईच्या मृत्यूनंतर मिळालेल्या शोकसंदेशांबद्दल कृतज्ञता. मी आणि माझ्या दिवंगत पालकांबद्दल माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी वेळ काढल्याबद्दल मी माननीय पंतप्रधानांचा आभारी आहे. हे सांत्वनदायक आहेत. हे शब्द नेहमी माझ्यासोबत असतील. जय अंबे."

मोदींनी पाठवलेल्या पत्राने अक्षय कुमार भावुक, म्हणाला ''हे शब्द नेहमी...''
Health | रोज एवढी पावलं चाला आणि फिट राहण्यासह आयुष्यही वाढवा

दरम्यान अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपट सिंड्रेलासाठी लंडनला शुटींग करत होता. मात्र आईची तब्येत बिघडल्यानंतर तो शुटींग अर्ध्यावरच सोडून मुंबईत परतला होता. अक्षय कुमार आणि मोदींचे चांगले संबंध आहेत. २०१९ मध्ये अक्षय कुमारने मोदींची मुलाखतही घेतली होती. ही मुलाखत अराजकीय असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं होतंं, मात्र विरोधकांनी या मुलाखतीवर जोरदार टीका केली होती. स्टॅंडअप कॉमेडीयन शाम रंगीलाने मोदींची मिमिक्री केली होती.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com