"गेल्या दोन वर्षांत सामान्यांच्या जीवनाचा दहीकाला झालाय" - केदार शिंदेची नेत्यांवर टीका

राजकारण्यांच्या खेचाखेचीत सामान्य जनता मात्र त्रस्त असल्याची भावना मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी व्यक्त केली आहे. एका ट्विटमधून त्यांनी राजकारण्यांवर निशाणा साधला आहे.
"गेल्या दोन वर्षांत सामान्यांच्या जीवनाचा दहीकाला झालाय" - केदार शिंदेची नेत्यांवर टीका
"गेल्या दोन वर्षांत सामान्यांच्या जीवनाचा दहीकाला झालाय" - केदार शिंदेची नेत्यांवर टीकाSaam Tv News
Published On

राज्यात दहीहंडी साजरा करण्यावरुन सरकार आणि विरोधकांमुळे जुंपली आहे. कोरोनामुळे दहीहंडी साजरा न करण्याचं आव्हान राज्य सरकार करतंय, तर काहीही झालं तरी दहीहंडी साजरा करणारच अशी भुमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. राजकारण्यांच्या या खेचाखेचीत सामान्य जनता मात्र त्रस्त असल्याची भावना मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी व्यक्त केली आहे. एका ट्विटमधून त्यांनी राजकारण्यांवर निशाणा साधला आहे. (People have suffered in the last two years said Kedar Shinde)

हे देखील पहा -

केदार शिंदे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ''राजकीय नेते एकमेकांच्या हंड्या फोडण्याचा कार्यक्रमात मग्न आहेत. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे. गेल्या दोन वर्षांत सामान्यांच्या जीवनाचा दहीकाला झालाय, याकडे कुणाचही लक्ष नाही.'' अशा खोचक शब्दांत त्यांनी राजकारण्यांवर टीका केली आहे.

अनेकांनी त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन केले आहे. केदार शिंदे यांच्या ट्विटला समर्थन देताना सिद्धेश सुर्वे नावाच्या एका यूजरने म्हटलं की ''निर्बंध फक्त सामान्य लोकांसाठी आहेत,ह्यांची आंदोलने,यात्रा,सोहळे ह्याला अपवाद आहेत. आपलं दुर्दैव हे आहे की ह्यांना जाब विचारण्यासाठी कुणीच नाही. न्यायालय ह्यामध्ये हस्तक्षेप का नाही करत हा मोठा प्रश्न आहे. ह्यामध्ये फक्त मरतोय सामान्य माणूस!''

तर सुहास नावाच्या युजरने जनतेला देखील जबाबदार धरत लिहीलं की, ''सामान्य लोकच ह्याला जबाबदार. स्वतःच डोकं न वापरल्याने त्याचं मडकं केले. पक्षांना फिरतं ठेवायचं (on toe). नाहीतर मतदारांना गृहीत धरतात. कठीण काळातच खरा कोण ते कळतं. 2024 ला तरी डोक वापरतील ही आशा?'' केदार शिंदेंच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहे.

दरम्यान दहीहंडीवरुन राज्यातलं राजकारण तापलं आहे. राज्यसरकारचे आदेश झुगारुन विरोधकांनी दहीहंडी फोडली आहे. त्यामुळे अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यात मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचप्रमाणे भाजपदेखील मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक झाली असून अनेक ठिकाणी भाजपने आंदोलन केलं आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना सरकार धार्मिक स्थळं उघडण्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळे हिंदुच्याच सणांवर बंदी का? मंदिरातूनच कोरोना होतो का? असा सवाल भाजपनं केलाय. राजकारण्यांच्या या आरोप-प्रत्यारोपात सामान्य जनता मात्र त्रस्त झाल्याची भावना केदार शिंदेंनी व्यक्त केली आहे.

"गेल्या दोन वर्षांत सामान्यांच्या जीवनाचा दहीकाला झालाय" - केदार शिंदेची नेत्यांवर टीका
पप्पा टेन्शमध्ये आहेत, ते काहीतरी करतील! ...(पहा व्हिडीओ)

केदार शिंदे यांनी अगं बाई अरेच्चा, जत्रा, यंदा कर्तव्य आहे, गलगले निघाले,  बकुळा नामदेव घोटाळे, इरादा पक्का अशा विविध मराठी सिनेमातून दिग्दर्शक म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय रंगभूमीवरही केदार यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. सही रे सही, लोचा झाला रे, श्रीमंत दामोदरपंत अशी अनेक नाटकं प्रसिद्ध आहे. याशिवाय हसा चकट फू, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय या मालिकांमधून त्यांनी छोट्या पडद्यावरही ओळख निर्माण केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com