Marathi Movie: शाळेतल्या प्रेमाची छोटुकली कहाणी; 'आत्मपॅम्फ्लेट'च टीझर प्रदर्शित

Aatmapamphlet Movie: 'आत्मपॅम्फ्लेट' चित्रपटाची ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे.
Aatmapamphlet Teaser Out
Aatmapamphlet Teaser OutSaam TV

Aatmapamphlet Teaser Released:

आत्मचरित्र, आत्मकथा, आत्मपरीक्षण हे शब्द आपण ऐकले आहेत. पण आता एक नवीन शब्द आणि चित्रपट तुमच्या भेटीला आला आहे. 'आत्मपॅम्फ्लेट', हे वाचून नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल.

'आत्मपॅम्फ्लेट' म्हणजे छोटीशी आत्मकथा. परेश मोकाशी आपल्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटाची ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. तर नुकताच आत्मपॅम्फ्लेट चित्रपटाचा टीझर आपल्या भेटीला आला आहे.

Aatmapamphlet Teaser Out
Welcome 3 Teaser: अक्षय कुमारने स्वतःसह चाहत्यांना दिले खास गिफ्ट; 'वेलकम 3'चा टीझर केला शेअर

'आत्मपॅम्फ्लेट' चित्रपटाच्या टीझरची सुरुवात शाळेतील मुलांपासून होते. हे कथा किशोर वयातील मुलाची आहे. त्याचे पहिले प्रेम या टीझरमध्ये दाखविण्यात आले आहे. तर एव्हरग्रीन गाणे 'धीरे-धीरे मेरे जिंदगी में आना' मराठीत करून टीझरमध्ये वापरण्यात आले आहे.

'आत्मपॅम्फ्लेट' चित्रपट ६ ऑक्टोबर २०२३ला प्रदर्शित होणार आहे. वाळवी चित्रपटाच्या यशानंतर परेश मोकाशी यांचा हा पहिला चित्रपट आहे. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाचे लेखक परेश मोकाशी म्हणतात, 'आत्मपॅम्फ्लेट म्हणजे आपल्या शालेय आयुष्यात, क्वचितच येऊन गेलेला सोप्पा पेपर आहे. आपल्यासारख्या छोटुकल्या लोकांच्या चरित्रातील ही टीन ऐजची पाने तशी खूप खळबळजनक असतात. त्या वयात आपल्या मनात, जनात, कुटुंबात, देशात खळबळच खळबळ उडालेली आपल्याला दिसत असते. या खळबळीचा हा निखळ आनंद देणारा खेळ!'' (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com