Satish Kaushik: सतीश कौशिक यांचा मृत्यू की घातपात? दिल्ली पोलीसांना मिळाली महत्वाची माहिती...

बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा मृत्यू संबंधित काही महत्वाचे पुरावे त्यांच्या हाती लागले आहेत.
Satish Kaushik
Satish Kaushik Saam TV
Published On

Satish Kaushik News: बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला असल्याचे स्पष्ट केल्यानंतर या प्रकरणाची दिल्ली पोलिसांनी पुन्हा एक मोठी अपडेट दिली आहे. हा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी काही महत्वाचे पुरावे त्यांच्या हाती लागले आहेत.

Satish Kaushik
Jr NTR On Oscars: ऑस्कर आधीच RRR सिनेमाला मोठा धक्का, ऑस्कर सोहळ्यातून 'नाटू नाटू गाणं.. Jr. NTR चं धक्कदायक विधान

या प्रकरणात तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी तेथील फार्म हाऊसमधून काही औषधं जप्त करण्यात आल्या आहेत. सतीश कौशिक मृत्यूपुर्वी एका पार्टीत सहभागी झाले होते. सध्या दिल्ली पोलीस त्यांच्या मृत्यूमागील गुढ उकलण्याचा प्रयत्न करत आहे.

सतीश कौशिक यांचे गुरुवारी 9 मार्चला निधन झाले होते. त्यांचे वयाचे ६६ व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडवर मोठी शोककळा पसरली. त्यांच्या अभिनयाने आणि स्वच्छंदी स्वभावाने त्यांचा मित्र आणि चाहता परिवार मोठा होता. गुरुवारी रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. पण आता; पुन्हा एकदा त्यांच्या मृत्यूचे नवे गूढ समोर आले आहे.

कौशिक यांचा मृत्यू कसा झाला? याबाबत दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरु केलीआहे. कौशिक त्यांच्या फार्म हाऊसवर गेल्यानंतर त्यांच्या तब्येतीत अचानक बिघडल्याची चर्चा झाली होती. लगेचच कौशिक यांना रुग्णालयात दाखल केले होते, त्यावेळी नेमकं काय घडलं, या गोष्टींचा पोलिसांकडून तपास सुरू होता.

सतीश मृत्युपूर्वी होळीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण या दरम्यान नेमकं काय घडलं याचा तपास सध्या दिल्ली पोलिस करीत आहेत.

Satish Kaushik
Pingla Gato Raja Shivrayanchi Gatha: 'टीडीएम' चित्रपटात 'पिंगळा' गाणार राजा शिवरायांची गाथा, शिवप्रेमींच्या अंगावर रोमांच उभे राहणार

गुरुवारी सतीश यांच्या शवविच्छेदन अहवालात हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पण आता हा मृत्यू संशयास्पद असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. सतीश ज्या फार्महाऊसवर होते तिथे काही औषधं दिल्ली पोलिसांना आढळून आली आहेत. पुढील तपास अद्याप सुरू असून आता या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com