Zee Marathi: अंधश्रद्धेवर पांघरुण टाकणारी मालिका 'दार उघड बये' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

एका गावात साधी, गरीब पण स्वाभिमान जपणारी मुलगी आणि पुरुषप्रधान संस्कृतींचा लढा या मालिकेत दिसून येणार आहे. आहे. प्रेक्षकांसाठी ही मालिका पाहणे रोमांचक ठरणार आहे.
Daar Ughad Baye Serial
Daar Ughad Baye Serial Saam Tv
Published On

मुंबई : झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या विषयाच्या मालिका आणत असते. काही तरी हटके विषय देण्याच्या बाबतीत 'झी मराठी' ची ओळख प्रेक्षकांमध्ये कायम आहे. सध्याचा काळ विज्ञान तंत्रज्ञानाचा काळ चालू आहे. भारत आता आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना सोबतच बऱ्यापैकी समाजात अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम जोरदार सुरु आहे. असाच एक विषय घेऊन 'झी मराठी' वर 'दार उघड बये' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेत मुख्य भूमिकेत सानिया चौधरी दिसत आहे. सानियाने नाटक, मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय करत आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच ती एक उत्तम नृत्यांगना असून ती या मालिकेत मंदिरातील संबळ वादकाची भूमिका साकारत आहे.

Daar Ughad Baye Serial
Dream Girl 2 Release Date: ईदच्या दिवशी पुन्हा होणार आयुष्मान खुरानाच्या पूजाची एन्ट्री

या मालिकेबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल सानिया सांगते 'मी मुक्ता ही भूमिका साकारत असून घर सावरण्यासाठी घरातील पुर्वजांपासून चालत आलेली संबळ वाजवण्याची कला मी शिकले. संबळ कसे वाजवावे हे शिकत गावची परंपरा या मालिकेत जोपासते. हे एक असे गाव आहे जिथे मुलीच्या हातात संबळ पाहणे एक अपशकुन मानले जाते. फक्त त्या गावात नाही तर महाराष्ट्रातील बऱ्याच गावांमध्ये अजूनही मुलींनी संबळ वाजवणे शुभ मानले जात नाही. अशा गावात एक साधी, गरीब पण स्वाभिमान जपणारी मुलगी आणि पुरुषप्रधान संस्कृतींचा लढा या मालिकेत दिसून येणार आहे. प्रेक्षकांसाठी ही मालिका पाहणे रोमांचक ठरणार आहे.'

Daar Ughad Baye Serial
Vaibhav Mangle: 'ती मी नाहीच' वैभव मांगलेने 'अलबत्या गलबत्या' नाटकाला केले रामराम

'दार उघड बये' ही नवीन मालिका १९ सप्टेंबरपासून, सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शरद पोंक्षे, सुहास परांजपे, किशोरी आंबिये, रुचिरा जाधव अशी कलाकारांची फौज असलेल्या या मालिकेचा प्रोमो बघून प्रेक्षकांची उत्कंठा नक्कीच शिगेला पोहोचली आहे. 'असे हे कन्यादान' या मालिकेनंतर बऱ्याच वर्षांनी शरद पोंक्षे पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com