अकोला: अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना गीत गायनाची प्रचंड आवड आहे. प्रशासकीय कामातून मिळालेल्या वेळातून ते आपला छंद जोपासत असतात. छंद जोपासत असताना त्यांनी आतापर्यंत तीन गीतं गायली आहेत. सध्या त्यांच्या भीमगीताची चर्चा अकोल्यात सुरू आहे. भीमजयंतीचे (Bhimjayanti) औचित्य साधत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) यांच्यावरील गीत नुकतच प्रसारित करण्यात आलं. उपजिल्हाधिकारी संजय खडसे (Sanjay Khadse) आणि त्यांच्या पत्नी नीता खडसे यांनी हे गीत गायलं आहे. (new Bhimgeet from sanjay khadse watch the video)
हे देखील पहा -
यापूर्वी या दाम्पत्याने कोरोना लसीकरण गीत, शिवजयंती विशेष गीत गायले होते. या दोन्ही गीतांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. आता पुन्हा उपजिल्हाधिकारी खडसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील भीमराया तुज नमो हे गीत गायलं आहे. हे गीत त्यांनी लोकांना समर्पित केले आहे. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कीर्ती जगात आहे, शिक्षणाचे प्रतीक, महिलांना सक्षमीकरण, दुर्बलांना बलशाली बनविण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांची साक्ष भारतीय राज्यघटना आहे त्यांची कीर्ती एवढी महान आहे की, त्यामुळे ते संपूर्ण विश्वात वंदनीय आहेत अशा प्रकारचा विचार या गाण्यांमधून मांडण्यात आलेले आहे.
प्रा. संजय खडसे ताण तणावातून मुक्तीसाठी यांना गायनाचा छंद जोपसतात, त्या छंदातून समाज प्रबोधनाचे गीत तयार केले. यापूर्वी लसीकरण प्रबोधन करिता सर्वांनी घ्यावं करून हे कोविड लसीकरण व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पर्वावर शिवरायांची जयंती आली हे गीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. त्यानंतर आता भीमराया तुझं नमो हे गीत तयार करून लोकार्पण केले आहे. निमा अरोरा जिल्हाधिकारी अकोला यांचे उपस्थितीत, सुप्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांचे शुभ हस्ते प्रसारित करण्यात आले आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.