Jhund vs Kashmir Files: आव्हाडांनी केले 'झुंड'च्या शो चे आयोजन

Jhund vs Kashmir Files News: ठाण्याच्या विवीयाना मॉलमध्ये (Viviana Mall, Thane) या चित्रपटाचं स्क्रिनींग ठेवलं आहे. १९ मार्चला सायंकाळी हे ५ः३० वाजता हे स्पेशल स्क्रिनींग ठेवण्यात आलं आहे.
Jitendra Awhad Organizing a Special Screening of Jhund Movie in Viviana Mall, Thane
Jitendra Awhad Organizing a Special Screening of Jhund Movie in Viviana Mall, ThaneSaam Tv News
Published On

मुंबई: देशात सध्या दोन चित्रपटांवरुन प्रचंड राजकारण (Politics) सुरु आहे. एक म्हणजे नागराज मंजुळे यांना दिग्दर्शित केलेला झुंड (Jhund) आणि दुसरा म्हणजे विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files).

या दोन चित्रपटांनी देशातलं राजकारण चांगलचं तापलयं. भारतीय जनता पक्षाकडून द काश्मीर फाईल्स चित्रपटाला समर्थन असून भाजपने या चित्रपटाचे अनेक शोज् स्वखर्चाने दाखवले. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी झुंड (Jhund) या चित्रपटाचं विशेष स्क्रिनींग ठेवलं आहे. ठाण्याच्या विवीयाना मॉलमध्ये (Viviana Mall, Thane) या चित्रपटाचं स्क्रिनींग ठेवलं आहे. १९ मार्चला सायंकाळी हे ५ः३० वाजता हे स्पेशल स्क्रिनींग ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या स्पेशल स्क्रिनींगला या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हेदेखील प्रत्यक्षात हजर राहणार आहेत. (NCP Leader Jitendra Awhad Organizing a Special Screening of Jhund Movie in Viviana Mall, Thane)

हे देखील पहा -

झुंड (Jhund):

झुंड हा नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट आहे. झी स्टुडिओ या प्लॅटफॉर्म अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिले असून यामध्ये अमिताभ बच्चन, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर यांसह नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. ४ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात वंचित समाजातील तरुणांचा संघर्ष यावर भाष्य करण्यात आलयं.

द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files):

द काश्मीर फाइल्स विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित, झी स्टुडिओज निर्मित हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात जम्मू आणि काश्मीरमधील उग्रवादादरम्यान पीडित काश्मिरी पंडितांच्या पलायनाचे चित्रण दाखवले गेले आहे. यात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

Jitendra Awhad Organizing a Special Screening of Jhund Movie in Viviana Mall, Thane
Bachchan Pandey: "माझी पिक्चर जाऊन बघ की" - अक्षय कुमारच्या सोलापूरच्या तरुणीशी मराठीत गप्पा...(पहा Video)

हे दोन्ही चित्रपट दोन वेगवेगळ्या विचारधारेकडे झुकतात. मात्र द काश्मीर फाईल्सवरुन भाजप राजकारण करत हा चित्रपट संपल्यानंतर काही भाजप कार्यकर्ते चित्रपटागृहात भाषण देत आहेत आणि एका विशिष्ट समाजाविरोधात भाजप जनतेला भडकवत आहे असा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला. तर हा चित्रपट वास्तववादी असल्याचं म्हणत भाजप नेत्यांनी या चित्रपटाला जोरदार समर्थन केल, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाबाबत भाष्य केलं होत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com