मुंबई : अभिनेता अरमान कोहलीच्या Actor Armaan Kohli घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने काल छापा टाकला होता. आज अरमान कोहलीला अटक करण्याची माहिती मिळाली आहे. ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणार्या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने NCB ने शनिवारी अभिनेता अरमान कोहली याच्या घरी छापा टाकण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री एनसीबीने एका ड्रग पेडलरला ताब्यात घेतले होते.
ड्रग्जच्या पेडलरची कसून चौकशी केल्यावर मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता अरमान कोहलीच्या घरी धाड टाकली होती. एनसीबीने अभिनेता गौरव दीक्षितला देखील अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणी गौरवला अटक करण्यात आली आहे. काही वेळाअगोदर गौरवच्या मुंबई Mumbai मधील घरात मादक पदार्थ सापडल्याची माहिती देखील पुढे आली आहे. यामध्ये एनसीबीला एमडी ड्रग्ज, चरस आणि इतर ड्रग्ज सापडले आहेत.
हे देखील पहा-
चित्रपट अभिनेता एजाज खानच्या केलेल्या चौकशीमुळे गौरवला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने मार्च महिन्यात अभिनेता एजाज खानला देखील अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणी ड्रग पेडलर शादाब बटाटाच्या अटकेनंतर एजाज खानचे नाव समोर आले. एजाज खानवर बटाटा गँगमध्ये सहभागी असल्याचे देखील आरोप लावण्यात आले आहे.
एनसीबीने मुंबईत सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला देखील अटक करण्यात आली होती. शादाबकडून तब्बल २ कोटी रुपयांचे ड्रग्ज एनसीबीने जप्त करण्यात आले आहे. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये जेव्हा ड्रग्सची बाजू समोर आली. ड्रग्सचे जाळे बॉलीवूडमध्ये कशाप्रकारे पसरलेले आहे. याचा पर्दाफाश करण्याचे काम समीर वानखेडे यांनी केले आहे.
बॉलिवूड मधील मोठं-मोठ्या नावांच्या कोणत्याही दबावाला न घाबरता एनसीबीने कायद्याचा धडा शिकवला आहे. बॉलीवूडमध्ये ड्रग्स कशा प्रकारे घेतले जाते, ते कोण पुरवते आणि कशाप्रकारे पुरवले जाते. या सगळ्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबईमध्ये जे ड्रग्सचे जाळे पसरले आहे. त्याला छाटण्याचे काम सुद्धा चोखपणे बजावले आणि ड्रग्सपासून होणारे नुकसानाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ज्यामुळे मुंबईमध्ये आणि विशेष करून, तरुणांमध्ये ड्रग्सच्या असलेल्या प्रमाणाला कमी करण्यास मोठे यश आले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.