Nawazuddin Siddiqui Cryptic Reaction The Kerala Story: अदा शर्मा स्टारर ‘द केरला स्टोरी’ सध्या सोशल मीडियावरच नाही तर बॉक्स ऑफिसवरही चांगलाच धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला सतत विरोध होऊन देखील चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 200 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. सध्या चित्रपटाबद्दल अनेक सेलिब्रिटींसह राजकीय मंडळींनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुकतंच कंगना रनौतनंतर नवाजुद्दिन सिद्दीकीनेही प्रतिक्रिया दिली आहे.
नवाजुद्दिन सिद्दीकी त्याच्या खासगी आयुष्यातील काही वादांमुळे तर चर्चेत आहे, पण सोबतच तो त्याच्या चित्रपटामुळे देखील चर्चेत आहे. नवाजचा ‘जोगी सारा रा रा’ हा आगामी चित्रपट येत्या २६ मे ला प्रदर्शित होणार आहे. नुकताच त्याने न्यूज १८ सोबत संवाद साधला. त्यावेळी त्याने ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटासंबंधित एक वक्तव्य केलं आहे. सध्या हे वक्तव्य सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
नवाजुद्दिन सिद्दीकी म्हणतो, “मी त्याच्याशी सहमत आहे.. पण जर एखादा चित्रपट किंवा कादंबरी एखाद्याला दुखावत असेल तर ते चुकीचे आहे.. आम्ही कधीच प्रेक्षक किंवा त्यांच्या भावना दुखावण्यासाठी चित्रपट बनवत नाही.”
तर नवाजुद्दिन सिद्दीकी पुढे म्हणतात, “चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच जोडणारा असावा, त्याने नेहमीच आपल्या प्रेक्षकांसोबत जोडून राहिले पाहिजे. त्यांच्यापासून होऊ नये. शिवाय या चित्रपटावर बंदी घालण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही.. पण जर एखाद्या चित्रपटात माणसे आणि सामाजिक सद्भाव नष्ट करण्याची ताकद असेल तर, ते चुकीचे आहे.”
सुदीप्तो सेन निर्मित ‘द केरला स्टोरी’ मध्ये तब्बल त्या ३२००० महिलांची कथा दाखवण्यात आली आहे. धर्मांतरित करून कशाप्रकारे ISISमध्ये भरती केले. हे दाखवले. या चित्रपटातून अदा शर्माने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनातून सोडली. सध्या तिच्या कामाचे सर्वच चाहते झालेय.
नवाजच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, नवाज सध्या ‘जोगी सारा रा रा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. नुकतंच शहनाज गिलच्या ‘देसी वाईब्स’ या कार्यक्रमात देखील नवाजुद्दिन प्रमोशनसाठी आला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.