Morya Official Song Released: मोरया! गणरायाच्या आगमनाचं नवं गाणं प्रदर्शित, बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाच्या आवाजाने गणेशभक्तांचं जिंकलं मन...

Morya Official Song: गणरायाची ही गाणी साऱ्या गणेशभक्तांना तल्लीन करून सोडणारी आहेतच अशातच आणखी एका नव्याकोऱ्या गणेशावरील भक्तिगीताने साऱ्यांच्या मनाचा ठाव घेतला आहे.
Morya Official Song Released
Morya Official Song ReleasedYou Tube

Morya Official Song Released

गणेशोस्तव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु झालेली पाहायला मिळतेय. ढोल-पथकांची जोरदार तालीम सुरू असलेली पाहायला मिळतेय. सोशल मिडियावर गणरायाच्या स्वागतासाठी अनेक गाणी ऐकू येऊ लागली आहेत. गणरायाची ही गाणी साऱ्या गणेशभक्तांना तल्लीन करून सोडणारी आहेतच अशातच आणखी एका नव्याकोऱ्या गणेशावरील भक्तिगीताने साऱ्यांच्या मनाचा ठाव घेतला आहे. 'श्री स्वामी समर्थ क्रिएशन' प्रस्तुत 'मोरया' या नव्या कोऱ्या भक्तिगीताने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

Morya Official Song Released
Jawan Movie Producer Trolled: किंग खानचा 'जवान' साऊथ चित्रपटाची कॉपी, निर्माते अ‍ॅटली यांच्यावर कथा चोरल्याचा आरोप

एका गणेशभक्ताने आर्त भावनेने गणरायाला वंदन करत घातलेली साद या 'मोरया' गाण्यातून स्पष्ट कळतेय. गणरायाचं आगमन झाल्यावर त्यांचा आनंद त्या गणेशभक्तांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय. यंदाच्या गणेशचतुर्थीला 'मोरया' हे मराठमोळं भक्तीगीत प्रत्येक गणेशप्रेमींच्या हृदयाचा ठोका चुकवायला सज्ज झालं आहे. ढोल, ताशांचा गजरात चित्रित झालेल हे गाणं प्रत्येक भक्ताच्या मनाचा ठाव घेईल यांत शंकाच नाही. 'मोरया' हे गाणं लागलं की अर्थात आपोआपच प्रत्येकाचे पाय थिरकू लागतायत. या गाण्यात अनेक गणेश भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय. अभिनेता डॉ. गौरव भोसले पाटील व अभिनेत्री डॉ. गायत्री भालेकर यांनी या गाण्यात मुख्य भूमिका पाहायला मिळाली.

Morya Official Song Released
Samantha Ruth Prabhu In Politics: समांथा रुथ प्रभू लवकरच सोडणार फिल्म इंडस्ट्री, अभिनेत्रीनंतर आता दिसणार राजकारणीच्या रुपात?

'श्री स्वामी समर्थ क्रिएशन' प्रस्तुत मोरया या गाण्याच्या निर्मितीची धुरा निर्माते विजुतात्या विष्णुपंत बहिरट व प्रमोद अरविंद नाईक यांनी सांभाळली आहे. तर दिग्दर्शक डॉ. कृणाल नंदकिशोर मेथा यांनी दिग्दर्शित केलं आहे. तर या गाण्याच्या संगीताची जबाबदारी प्रसाद प्रभाकर शिंदे यांनी सांभाळली असून गायक नकाश अझीझ याने त्याच्या दमदार व सुमधुर आवाजात हे गाणं गायलं आहे.

Morya Official Song Released
Asha Bhosle Birthday Special Post: ‘माझ्याकडे देव माझा पाहतो आहे...’ सावनी रविंद्रची आशा भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार आवाजाने चाहतावर्ग तयार केलेल्या नकाश अझीझ या गायकाने साऱ्यांच्या मनावर ताबा मिळवला. आजवर हिंदी सिनेसृष्टीत त्याने बरीच हिट गाणी गायली असून त्याच्या सुमधुर आवाजात त्याने मराठीतील बाप्पाला वंदन करणार 'मोरया' हे गाणं गायलं आहे. तर गीतकार मंगेश कांगणे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. गणेशचतुर्थीचं औचित्य साधत गणेशभक्तांच्या भेटीस आलेलं 'मोरया' हे गाणं एक पर्वणी ठरेल यांत शंकाच नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com