60व्या मजल्यावरून उडी मारून मिस USAची आत्महत्या; हरनाझ संधूने व्यक्त केला शोक

मिस यूएसए 2019 झालेल्या चेस्ली क्रिस्टने 60 मजली इमारतीच्या 29व्या मजल्यावरून उडी मारली आहे. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Harnaaz Sandhu and Cheslie Kryst
Harnaaz Sandhu and Cheslie KrystInstagram/@chesliekryst
Published On

मिस यूएसए 2019 (Miss USA 2019) आणि अमेरिकन मॉडेल चेल्सी क्रिस्टने (Cheslie Kryst) 60 मजली इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली आहे यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. या मॉडेलने मृत्यूच्या काही तास आधी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. चेल्सी आपल्या अकाउंटवर सतत मानसिक आरोग्याबद्दल बोलत असे.

harnaaz sandhu
harnaaz sandhuInstagram/@harnaazsandhu_03

वृत्तसंस्थेनुसार, 30 वर्षीय चेल्सी क्रिस्टने मॅनहॅटनमध्ये यूएस वेळेनुसार, सकाळी 7.15 वाजता संशयास्पदरीत्या तिने आत्महत्या केली आहे. 60 मजली ओरियन बिल्डिंगमध्ये 9व्या मजल्यावर तिचे अपार्टमेंट होते आणि त्याच अपार्टमेंट वरून तिने आत्महत्या केली आहे. ती शेवटी 29व्या मजल्यावर ती दिसली होती. अलीकडेच भारताची हरनाज कौर संधू (Harnaaz Sandhu) मिस युनिव्हर्स (Miss Universe) बनली तेव्हा तिने तिच्यासोबतचा फोटोही इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला होता.

2019 मध्ये, चेल्सी क्रिस्टने 2019 मध्ये नॉर्थ कॅरोलिनाचे प्रतिनिधित्व केले आणि मिस यूएसए 2019 चे विजेतेपद पटकावले होते. त्याचबरोबर ती व्यवसायाने वकीलही होती. चेस्ली ही वकील, फॅशन ब्लॉगर आणि 'एक्स्ट्रा टीव्ही' या शोची सूत्रसंचालकसुद्धा (Anchoring) होती. मात्र तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आपल्या आत्महत्येपूर्वी चेस्लीने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला होता. 'हा दिवस तुमच्या आयुष्यात आराम आणि शांतता आणू दे', असं कॅप्शन तिने या फोटोला दिले होते. चेस्लीच्या मृत्यूवर 'मिस युनिव्हर्स' हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) शोक व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com