'पंचायत' मधील पाण्याच्या टाकीवरील रिंकीची सोशल मीडियावर क्रेझ

अ‍ॅमेझॉन प्राइमच्या वेब सिरीज 'पंचायत'चा दुसरा सीझन रिलीज झाला आहे.
Panchayat
PanchayatSaam Tv
Published On

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉन प्राइमवरील 'पंचायत' (Panchayat) वेब सिरीजचा दुसरा सीझन उद्या म्हणजेच २० मे'ला रिलीज होणार आहे. पण पहिल्या सिझनच्या शेवटच्या भागात एका नव्या पात्राने दार ठोठावले होते. हे पात्र दुसरे तिसरे कोणी नसून रिंकी होती. रिंकी म्हणजे प्रधानजींची मुलगी. पंचायत सचिव आणि रिंकीची पहिली भेट गावातील पाण्याच्या टाकीवर होते. तिथेच पहिल्या सीझनचा शेवट झाला आहे. येथुन पुढे 'पंचायत'चा दुसरा सीझन सुरू होणार आहे. या रिंकीने शेवटच्या सीझनमध्ये एकदाच तोंड दाखवले आहे. पण या रिंकीने चाहत्यांच्या हृदयावर आणि मनावर जबरदस्त निर्माण केली आहे. ही रिंकी कोण आहे माहीत आहे का? ही अभिनेत्री आहे सान्विका.

दुसऱ्या सीझनमध्ये रिंकीला काम करण्यास चान्स मिळाला आहे. तिचा सचिवांसोबतच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत. रिंकी म्हणजेच सान्विका तिच्या इंस्टाग्रामवर अनेक फोटो आहेत. तिच्या रिंकी या व्यक्तिरेखेचे ​​प्रचंड कौतुक होत आहे. सान्विका तिच्या रिंकी अवताराने चाहत्यांना आकर्षित करण्यात यशस्वी झाली आहे. तिने तिच्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

पंचायतचा (Panchayat) दुसरा सीझन २० मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण ऑनलाईन लीक झाल्याची बातमी येताच, OTT प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइमने ते १८ मे रोजी रिलीज केले. ही वेब सिरीज २० मे रोजी रिलीज होणार होती. पण दोन दिवसापूर्वीच १८ मे'ला रिलीज केली आहे. आता वेब सिरीज लिक होण्याचे प्रमाण वाढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com