Sunil Tawade: सुनिल तावडेंनी धरला लेकीच्या हळदीत जबरदस्त ठेका, व्हिडीओपाहून नेटकऱ्यांचं हसू आवरेना

सुनील तावडेंची लेक अंकिताची हळद खूप जोरात झाली, सध्या हळदीतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sunil Tawade Viral Video
Sunil Tawade Viral VideoInstagram

Sunil Tawade Viral Video: सध्या सर्वत्र लग्नसराई खूप जोरात सुरू आहे. अशातच अनेक सेलिब्रिटी ही सध्या आपले लग्न उरकत आहेत. सेलिब्रिटींच्या लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता आणखी एक मराठी सेलिब्रिटीची लेक लग्नबंधनात अडकत आहे. मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. सुनील तावडेंची लेक अंकिताची हळद खूप जोरात झाली, सध्या हळदीतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sunil Tawade Viral Video
Viral Video: अवलियाने मन जिंकलं! 5 भाषांमध्ये गायले 'केसरिया' गाणे, जादूई आवाजाने मोदींनाही लावले वेड; पाहा VIDEO

सुनील यांची लेक अंकिताच्या हळदीचा कार्यक्रम गुरुवारी अर्थात १६ मार्च रोजी होती. दरम्यान कार्यक्रमातील खास क्षणांचे व्हिडीओ सुनील यांचा मुलगा शुभंकर तावडेने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहे. यामध्ये सुनील यांनी आपल्या लेकीच्या हळदीमध्ये खास ठेका धरला होता.

लाडक्या लेकीच्या हळदीमध्ये तुफान नाचणाऱ्या सुनील यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अंकिताला हळद लावत असताना सोबतच गाण्यांवर ठेका धरताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. तर त्यानंतर कुटुंबातील इतर मंडळींबरोबर ते डान्स करत आहेत. तसेच लेक शुभंकर बरोबरही त्यांनी डान्स केला असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Sunil Tawade Viral Video
‘अरं लेका दमानं...!’ कार्तिकला Bhool Bhulaiyaa 2 मधील ‘ती’ सिग्नेचर स्टेप करणं भोवलं, सेटवर डॉक्टर आले आणि...

सुनील यांचे दोन्ही ही मुलं सिनेसृष्टीसंबंधीत आहेत. मुलगी अंकिता स्टार प्रवाह वाहिनीमध्ये वरिष्ठ निर्माती म्हणून काम पाहते. तर शुभंकरही अभिनयक्षेत्रामध्ये उत्तम काम करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर डान्स करतानाचा सुनील यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com