Swabhiman- Shodh Astitvacha: ‘या’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची भावूक पोस्ट चर्चेत...

टीआरपी मध्ये अव्वल असलेल्या स्टार प्रवाहवरील मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
Swabhiman Shodh Astitwacha Latest Update
Swabhiman Shodh Astitwacha Latest UpdateSaam Tv
Published On

Swabhiman Shodh Astitwacha Latest Update: ‘स्टार प्रवाह’वरील अनेक मालिका प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहेत. त्यातील एक मालिका म्हणजे, ‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’. सध्या ही मालिका टीआरपीमध्ये टॉप १० मध्ये आहे. जरी ही मालिका टीआरपी मध्ये अव्वल असली तरी ही मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडण्यात ही मालिका कमी पडल्याने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री आसावरी जोशी हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत असून त्या अभिनेत्रीने पोस्टमध्ये आपल्या मनातील काही भावना चाहत्यांसोबत शेअर केल्या आहे. मालिका लवकरच प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेत असल्याने या अभिनेत्रीने ही चाहत्यांसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. या मालिकेत आसावरी जोशीने आदिती सूर्यवंशी नावाचे पात्र साकारले आहे. अनेक दिवसांच्या मोठ्या गॅपनंतर तिने टेलिव्हिजनसृष्टीत पदार्पण केले होते.

Swabhiman Shodh Astitwacha Latest Update
TDM Film Support: नाद करा पण आमचा कुठं... 'टीडीएम'ला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ग्रामीण भागातून मिळतोय चित्रपटाला पाठिंबा

आसावरीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली, “आज स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही प्रेक्षकांची लाडकी मालिका निरोप घेत आहे. मला माहिती आहे, माझ्याप्रमाणे तुम्ही सर्वजण खूपच भावुक झाले आहात. आजच या मालिकेचे ७०० भाग पूर्ण होत आहेत. या मालिकेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं मनोरंजन करता आलं याचा आनंद आहे. लवकरच एका नवीन मालिकेच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी मला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे... धन्यवाद....”

‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’ या चित्रपटात अभिनेत्री आसावरी जोशीसोबत, पूजा बिरारी आणि अभिनेता अक्षर कोठारी प्रमुख भूमिकेत आहेत. मालिकेत भूमिकेत आसावरी जोशी, अशोक शिंदे, सुरेखा कुडची, प्रसाद पंडित हे कलाकार मंडळी देखील आहेत. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका नवव्या क्रमांकावर असून प्रेक्षकांकडून या मालिकेला 4.8 रेटिंग मिळाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेने बाजी मारली होती. पण आता पुन्हा एकदा टीआरपी घसरल्याने निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com