कलावंतांना रोजगार हमी योजनेत सामील करून खड्डे बुजवण्याची काम द्या- अभिजित पानसे

राज्यात 15 ऑगस्टपासून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण चित्रपटगृहे नाट्यगृहे आणि देऊळ बंदच राहतील या सरकारच्या निर्णयावर आता मराठी दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक अभिजित पानसे यांनी देखील उपरोधिक टोला लगावला आहे.
कलावंतांना रोजगार हमी योजनेत सामील करून खड्डे बुजवण्याची काम द्या- अभिजित पानसे
कलावंतांना रोजगार हमी योजनेत सामील करून खड्डे बुजवण्याची काम द्या- अभिजित पानसेtwitter/@abhijitpanse
Published On

पुणे : राज्यात 15 ऑगस्टपासून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामध्ये आठवड्याचे सातही दिवस रात्री 10 पर्यंत दुकाने, उपहारगृहे तसेच मॉल्स सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण चित्रपटगृहे नाट्यगृहे आणि देऊळ बंदच राहतील असा निर्णय दिला होता. सरकारच्या या निर्णयानंतर मराठी चिपत्रपट सृष्टीतले अभिनेते प्रशांत दामले Prashant Damle यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. सरकारच्या निर्णयावर आता मराठी दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक अभिजित पानसे यांनी देखील उपरोधिक टोला लगावला आहे.

त्यांनी ट्विट करत सरकारला म्हणले आहे की, सरकारने नाट्य कलावंत आणि बॅकस्टेज कलाकारांना निदान रोजगार हमी योजनेत सामील करून खड्डे बुजवण्याची कामं द्यावीत. कारण नाट्यगृहात कोरोना आहे, रस्त्यावर नाही ! )

प्रशांत दामले यांची सरकारला पोस्ट-

'राज्यातील हॉटेल्स मालकांचे, रेस्टॉरंट मालकांचे, जिम मालकांचे, मॉल्स मालकांचे हार्दिक अभिनंदन. मोगॅम्बो खुश हुवा! म्हणजे आता हळूहळू नाट्यगृह, सिनेमागृह उघडण्याचा शेवटचा (अनावश्यक) टप्पा लवकरच येईल, अशी आशा बाळगू या. आता काळजी घ्यायलाच हवी. मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. सांस्कृतिक मंत्री आणि महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार' अशी पोस्ट फेसबुक वर लिहित प्रशांत दामलेंनी सरकारला उपरोधिक टोला लगावला होता.

कलावंतांना रोजगार हमी योजनेत सामील करून खड्डे बुजवण्याची काम द्या- अभिजित पानसे
कलावंतांना रोजगार हमी योजनेत सामील करून खड्डे बुजवण्याची काम द्या- अभिजित पानसेFacebook/@Prashant Damle

त्यामुळे अखेर निर्बंध शिथिल करून राज्यातील सामान्य जनतेला मुख्यमंत्री यांनी दिलासा तर दिला. पण असे असेल तरी चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे हे अजूनही बंदच आहेत. कारण नाट्यगृहात कोरोना आहे, रस्त्यावर नाही असा कलाकारांच्या मनात संताप आहे. त्यांच्या भविष्याबत सरकारने काहीच निर्णय न घेणतळ्याने आणि चित्रपट गृह सुरु करण्याचे काही संकेत सुद्धा दिसत नसल्याने अनेक कलाकार नाराज झाले आहेत. अभिनेता उमेश कामतने 'फक्त नाटकाच्या थिएटर्समध्येच कोरोना आहे का?', असा सवाल केला होता. "आजूबाजूला पाहिलं तर सर्व गोष्टी सुरू झालेल्या दिसत आहेत. मग फक्त नाटक सृष्टी का थांबली आहे. कोरोना हा फक्त नाटकाच्या थिएटर्समध्येच असतो का", असं तो म्हणाला होता.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com