Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Marathi Actress At Marathi Bhasha Vijay Melava: आज वरळी डोम येथे विजयी मेळावा होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी भाषेसाठी एकत्र आले आहेत.
Marathi Bhasha Vijay Melava
Marathi Bhasha Vijay MelavaSaam Tv
Published On

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज विजयी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या विजयी मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मनसैनिक आणि शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहे. थोड्याच वेळात वरळी डोम येथे विजयी मेळावा सुरु होईल. या विजयी मेळाव्याला अनेक मराठी कलाकारांनीही हजेरी लावली आहे. मराठी भाषेसाठी सर्वांनी एकत्र यायलाच हवं, असं मत त्यांनी मांडलं आहे.

Marathi Bhasha Vijay Melava
Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि तेजस्विनी पंडितची उपस्थिती

वरळी येथील डोम मोळाव्यासाठी भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि तेजस्वीनी पंडित यांनी हजेरी लावली आहे.

भरत जाधव यांची प्रतिक्रिया

मराठी भाषा हा मोठा मुद्दा आहे त्यामुळे इथे येऊन हजर राहणे खूप गरजेचे आहे, असं आम्हाला वाटतं. पूर्ण ठाकरे कुटुंबाशी आमचे जवळचे संबंध आहेत. आपल्या राज्यात राहून आपण स्वतःचं अपमानित होत आहोत, असं व्हायला नाही पाहिजे.

भरत जाधव यांनी प्रश्न विचारण्यात आला होता की, एक गृहस्थ आहेत की, जे म्हणत होते की, मी ३० वर्षे मुंबईत राहतो. तरीही मराठी बोलत नाही. तर यावर भरत जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, त्यांचे ३० वर्ष संपत आलेत की काय, प्रत्येकजण आपापलं मत व्यक्त करत आहे. मराठी माणसाने जागं व्हायलं हवं, मराठी भाषेला जपायला हवं. हिंदी ही चांगली भाषा नाही, असं म्हणत नाही. परंतु त्याची सक्ती नसावी. इथे येऊन जर तुम्ही धंदा करतात तर मराठी बोलायची लाज कशायला वाटायला पाहिजे.

सिद्धार्थ जाधवची प्रतिक्रिया

हा मुद्दा आपण खूप वेळा बोललो आहोत. आज वर्तमानात जगताना हा सोहळा बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी मी आलेलो आहे. आज साहेब काय बोलणार आहे हे पाहायचे आहे. मी ज्या ज्या लोकांसोबत काम केलंय, हिंदी चित्रपटातील रोहित शेट्टी यांचे मराठीविषयी, मराठी कलाकारांविषयी खूप आदर आहे. त्यामुळे कोण काय बोललंय याबाबत मला काहीही बोलायचं नाही. आणि या सर्व गोष्टींना आज उत्तर मिळणार आहे, असं सिद्धार्थ जाधवने म्हटलं आहे.

Marathi Bhasha Vijay Melava
Uddhav Thackera यांचं MVA बाबत मोठ वक्तव्य ! MVA ला तडा जावून देणार नाही

तेजस्वीनी पंडितची भूमिका

आज खूप उत्साह आहे. महाराष्ट्रासाठी एवढी माणसं एकत्र येत आहेत. महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी दोन भांवंड त्यांच्यातील मतभेद विसरुन एकत्र येत आहेत, त्यापेक्षा काहीही मोठं नाही.दोन्ही ठाकरे बंधू आज काय बोलणार आहेत हे ऐकण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. हा मराठी विरुद्ध हिंदी वाद नव्हता. हा वाद सक्तीचा होता, असं तेजस्वीनी पंडितने म्हटलं आहे.

Marathi Bhasha Vijay Melava
Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com