Priya Bapat : प्रिया बापटचा भन्नाट परफॉर्मन्स; लाईव्ह कॉन्सर्टमधील गाण्याचं होतंय कौतुक

Priya Bapat Live Concert Performance: मराठी अभिनेत्री प्रिया बापटने लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाणे गायले. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Priya Bapat Live Concert Performance
Priya Bapat SAAM TV
Published On

मराठी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) कायमच तिच्या कामामुळे चर्चेत असते. तिच्या जबरदस्त अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आता मात्र प्रिया एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. प्रियाने लोकप्रिय कॉन्सर्टमध्ये भन्नाट परफॉर्मन्स केला आहे. प्रिया उत्कृष्ट गायिका आहे. तर तिने कॉन्सर्टमध्ये खूपच सुंदर गाणे गायले आहे. जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

umesh kamat
umesh kamatinstagram

प्रियाने सोशल मीडियावर या कॉन्सर्टची एक पोस्ट केली आहे आणि त्याला खास कॅप्शन दिलं आहे. या पोस्टमध्ये प्रियाने ती गाणे गात असलेला कॉन्सर्टमधील व्हिडीओ शेअर केला आहे. प्रिया बापटने इंडियन ओशन या बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाणे गायले आहे.

इंडियन ओशन बँडचा (Live Indian Ocean Concert) जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. या कॉन्सर्टचा प्रियाचा अनुभव तिने पोस्टच्या कॅप्शनमधून चाहत्यांपर्यंत पोहचवला आहे. प्रिया बापटने पोस्टमध्ये लिहिलं की, "ही आयुष्यातील सुंदर संध्याकाळ कायम माझ्या लक्षात राहील. कॉलेजपासून ज्या बँडचे मला कौतुक होते तो इंडियन ओशन बँडच्या कॉन्सर्टमध्ये गाणे गाण्याची संधी मिळेल कधी विचारपण केला नव्हता. मला माझे स्वप्न जगू दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे." यासोबतच तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहे."

प्रियाच्या या व्हिडीओवर चाहते आणि कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे. प्रियाच्या गाण्याचे उमेशने कौतुक केले आहे. इंस्टाग्रामावर प्रियाच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर करून त्याला हॉर्ट इमोजी दिला आहे.

अभिनेत्री प्रिया बापटने अनेक हिंदी आणि मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. ती आपल्या दमदार अभिनयाने कोणत्याही भूमिकेला चार चाँद लावते. प्रियाचा मोठा चाहतावर्ग आहे.

Priya Bapat Live Concert Performance
Mrunal Thakur : 'तू मराठी आहेस का?' चाहत्याच्या प्रश्नावर मृणालचं खास उत्तर, गायले 'हे' गाणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com