मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचे वयाच्या 61 व्या वर्षी निधन

आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
Prema Kiran
Prema KiranSaam Tv
Published On

मुंबई - मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे पहाटे १ मे २०२२ रोजी मुंबई येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले होते. वयाच्या ६१ व्या वर्षी या अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मराठी बरोबरच हिंदी व भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले. त्या मुळच्या पुण्याच्या होत्या. त्यांनी विविध चित्रपट, मालिका, कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा व दोन हजार पेक्षा जास्त नाटकांमध्ये काम केले.

हे देखील पाहा -

प्रेमा किरण मराठी अभिनेत्री असण्यासोबतच निर्मात्या देखील होत्या. प्रेमा किरण यांनी धूम धडक (1985), पागलपन (2001), अर्जुन देवा (2001), कुंकू झाले वैरी (2005) आणि लग्नाची वरात लंडनच्या घरात (2009) यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

प्रेमा किरण यांनी 80 आणि 90 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दे दणदण, धूमधडका आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांची या चित्रपटातील गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहेत.

Prema Kiran
संतापजनक! ऊस वाहतूक गाडी मालकाने 13 ऊसतोड मजुरांसह 9 लहान मुलांना ठेवलं डांबून

अभिनयासोबतच त्यांनी 1989 मध्ये आलेला 'उतवाळा नवरा' आणि 'थरकप' या चित्रपटांचीही निर्मिती केली. प्रेमा किरण यांनी केवळ मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, अवधी आणि बंजारा भाषांमधील चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com