Marathi Celebrity On Maharashtra Politics: राज्यात ‘पाऊस आणि भूकंप एकत्र?’, अनेक सेलिब्रिटींनी शेअर केली राज्याच्या राजकारणावर परखड मतं

Marathi Celebrity Post In Maharashtra Politics: महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर अनेक मराठी सेलिब्रिटींनीदेखील सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Marathi Celebrity Post In Maharashtra Politics
Marathi Celebrity Post In Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

Marathi Celebrity Post: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी मोठं राजकीय बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवार यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यासह देशात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा देत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय भूकंपावर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. सोबतच आता महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर अनेक मराठी सेलिब्रिटींनीदेखील सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Marathi Celebrity Post In Maharashtra Politics
Jacqueline Fernandez Buys New Home: जॅकलिन फर्नांडिसने मुंबईत घेतलं नवं कोरं घर, किंमत ऐकून बसेल ४४० व्होल्टेजचा झटका

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर काल संध्याकाळपासून अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता स्वप्निल जोशी, दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेते शरद पोंक्षे सह आणखी काही अभिनेत्यांनी राजकारणाच्या राजकारणावर आपलं परखड मत मांडत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. (Marathi Actors)

Sonalee Kulkarni Post
Sonalee Kulkarni PostInstagram

राज्यातील राजकीय घडामोडीविषयी सोनाली कुलकर्णीनं स्टोरी शेअर केली आहे. सोनाली स्टोरीमध्ये म्हणते, “पाऊस आणि भूकंप एकत्र? हे चाललंय तरी काय?” असं प्रश्न सोनालीने सोशल मीडिया युजर्सला विचारला आहे. सोबतच तिच्या स्टोरीमध्ये रिॲक्ट बारमध्ये ‘मजाक’ लिहित ही स्टोरी शेअर केली आहे. सोनालीची ही स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

तर अभिनेत्री अभिज्ञा भावे म्हणते, “सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण” असं म्हणत तिने एक मीम शेअर केला आहे. शेअर केलेल्या मीममध्ये ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतील एक सीन शेअर केला. या सीनमध्ये अभिज्ञा भावे आणि शिल्पा तुळसकर दिसत आहे.

Marathi Celebrity Post In Maharashtra Politics
Saisha Bhoir Get Replace : आई - वडिलांमुळे साईशा भोईरचे करियर धोक्यात ? मालिकेतून झाली रिप्लेस

स्वप्निल जोशीनेही महाराष्ट्राच्या राजकारणावर आपले मत मांडले. अजित पवारांच्या शपथविधीनंतर शेअर केलेल्या ट्वीटमध्ये “उत्तम पटकथा लिहिण्याची कला” असं स्वप्नील जोशी म्हणाला आहे. त्याचं हे ट्वीट सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय.

तर दिग्दर्शक हेमंत ढोमे ट्वीटमध्ये म्हणतो, “खेळ तर आता सुरु झालाय…”. तर मराठी टेलिव्हिजन सृष्टीतील सर्वाधिक चर्चेत राहणारं नाव म्हणजे शरद पोंक्षे. शरद पोंक्षे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “ “तत्व”, “वैचारिक बैठक”, “नितिमत्ता” हे शब्द वारले.” अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी आपल्या ३५ आमदारांच्या पाठिंब्यासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये काल सहभागी झाले. काल झालेल्या शपथविधी सोहळ्यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून इतर आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

महाराष्ट्रामध्ये आधी दोन पक्षाचं सरकार होतं, परंतू आता तीन पक्षाचं सरकार स्थापन झालं आहे. रविवारी मुंबईतील राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात अजित पवारांसोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्माराव अत्राम, धनजंय मुंडे, आदिती तडकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com