'जिगल जिगल... '; हॉट अँड बोल्ड मलायकाचा जबरा डान्स व्हायरल

इंस्टाग्रामवर सध्या रील्समुळे अनेक गाणी व्हायरल होत आहेत. त्यातील असच एक गाणं सध्या इंस्टाग्रामवर प्रचंड ट्रेंड होत आहे.
malaika arora
malaika aroraSaam Tv
Published On

मुंबई : इंस्टाग्रामवर (Instagram ) सध्या रील्समुळे अनेक गाणी व्हायरल होत आहेत. त्यातील असच एक गाणं सध्या इंस्टाग्रामवर प्रचंड ट्रेंड होत आहे. तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर तुम्हाला 'माय मनी डोन्ट जिगल जिगल' या गाण्याबद्दल माहिती असेलच. माधुरी दीक्षित आणि दिशा पटानीसह अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर रील्स केलं आहे. आता अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika arora) हिनं देखील या व्हायरल गाण्यावर तिच्या आकर्षित अदेने रील्स केला आहे. मलायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मलायकाच्या धमाकेदार नृत्याच्या अदा पाहायला मिळत आहेत. ( malaika arora Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

मलायका अरोराच्या या व्हिडीओमध्ये तिनं चमकदार फ्रिंज टॉप आणि स्कर्ट घातलेली दिसत आहे. तिच्यासोबत आणखी दोन मुलीही दिसत आहेत. मलायकाने या दोघींसोबत 'मनी डोन्ट जिगल जिगल' वर डान्स केला. व्हिडिओमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत होती. व्हिडीओ शेअर करताना तिनं, "खूप छान वाटले, शूट केले, हटवणार नाही." असे कॅप्शन तिनं दिलं आहे. तसेच तिनं हॅशटॅगमध्ये 'ट्रेंडिंग रील' आणि ' माय मनी डोन्ट जिगल जिगल' वापरले आहेत.

मलायका अरोराच्या या व्हिडीओ पोस्टवर तिचे चाहते आणि फॉलोअर्स फायर इमोजीसह प्रतिक्रिया देत आहेत. तिची बहीण अमृता अरोरासह तिच्या इंडस्ट्रीतील मित्रांनी हसणाऱ्या इमोजीसह तिच्या या नृत्याच्या अदेचे कौतुक केले आहे. एका चाहत्याने कमेंट केली 'तू खूप सुंदर दिसत आहेस, नेल्ड इट गर्ल.' दुसर्‍या चाहत्याने लिहिलं, 'बार्बी डॉल.'

malaika arora
बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इनच्या चर्चांवर राखी सावंतने सोडलं मौन; म्हणाली, लवकरच...

दिशा पटानीनेही केला जिगलवर डान्स...

दिशा पटानीने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिने नृत्यदिग्दर्शक डिंपल कोटेसोबत 'माय मनी डोन्ट जिगल जिगल' या गाण्यावर नृत्य केलं होतं. या गाण्यासाठी तिनं एक साधा टी-शर्ट आणि स्कर्ट घातला होता. यामध्ये तिनं मेकअप केला नव्हता. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने 'चिलिन...' असे लिहिले आहे.

माधुरी दीक्षितही नाचली जिगलवर...

दिशा पटानीनंतर माधुरी दीक्षितने देखील व्हायरल ट्रेंडीग जिगल जिगल गाण्यावर नृत्य केलं आहे. हा व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या डान्स व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं 'जिगल विगल ड्रिबल' असं लिहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com