
Year-ender 2024 : २०२४ या वर्षात बॉलीवूडमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. अनेक चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये इंटर झाले, काही कलाकारांचे लागण झाले, काही कलाकारांच्या घरी छोटे पाहुणे आले अशा विविध यावर्षी घडल्या आहेत. पण यावर्षी अनेक सेलिब्रिटींचा ब्रेकअप्स आणि काहींचा डिव्होर्स देखील झाला. ज्यामुळे या सेलिब्रिटींचे चाहते निराश झाले. जाणून घेऊयात यावर्षी नक्की कोणते सेलिब्रिटी एकमेकांपासून दूर झाले.
मलायका अरोरा-अर्जुन कपूर
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर जवळजवळ सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनीही अधिकृतपणे ब्रेकअपची पुष्टी केली नसली तरी, मलायकाने तिच्या सोशल मीडियावरून त्यांचे फोटो डिलीट केले आणि १ नोव्हेंबर रोजी तिच्या पोस्टने वेगळे होण्याचे संकेत दिले. ऑक्टोबरमध्ये,अर्जुन कपूरने त्याच्या 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमादरम्यान तो सिंगल असल्याचे सांगितले होते ज्यामुळे या दोघांचा ब्रेकअप झाल्याचे चाहत्यांना कळले.
हार्दिक पांड्या - नताशा स्टॅन्कोविक
क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री-मॉडेल नताशा स्टॅन्कोविक यांनी जुलै २०२४ मध्ये लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांच्या विभक्ततेची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली, जिथे स्टॅन्कोविकने एक हार्दिक संदेश शेअर केला: “चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर, हार्दिक आणि मी परस्पर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले आणि आमचे सर्वस्व पणाला लावले, पण आम्हाला वाटते की हेच आमच्या दोघांसाठी सर्वोत्तम आहे.”
सानिया मिर्झा-शोएब मलिक
जानेवारी २०२४ मध्ये, माजी टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी त्यांचे १४ वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आणल्याची घोषणा केली. त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवा अनेक महिन्यांपासून पसरत होत्या, परंतु मिर्झाची बहीण अनम यांच्या निवेदनाद्वारे याची पुष्टी झाली. निवेदनात असे लिहिले आहे की, “सानिया आणि शोएब अनेक महिन्यांपासून वेगळे राहत आहेत आणि काही काळापूर्वी त्यांचा घटस्फोट झाला आहे.”
उर्मिला मातोंडकर-मोहसीन अख्तर मीर
सप्टेंबर २०२४ मध्ये, बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने आठ वर्षांच्या लग्नानंतर पती मोहसिन अख्तर मीरपासून वेगळे होण्याची घोषणा केली. मातोंडकरने काही महिन्यांपूर्वीच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, परंतु त्यावेळीच ही बातमी सोशल झाली होती. परंतु विभक्त होण्यामागील कारणे अद्याप उघड केलेली नाहीत.
ए आर रहमान-सायरा बानू
संगीतकार ए आर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या विभक्त होण्याच्या घोषणेसह चाहत्यांना धक्का दिला आणि त्यांचे २९ वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले. त्यांच्या कायदेशीर टीमने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, "अनेक वर्षांच्या लग्नानंतर, ए आर रहमान आणि सायरा बानू यांनी वेगळे होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. एकमेकांवर त्यांचे गाढ प्रेम असूनही, भावनिक ताण आणि सततच्या तणावांमुळे त्यांना असा निर्णय घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.