Video: कल्याणची चुलबुली दिसली मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीत; शिवालीचा 'तो' व्हिडिओ पाहिलात का?

शिवालीने एका हिंदी जाहिरातीमध्ये काम केले आहे.
Shivali Parab Video
Shivali Parab VideoInstagram @parabshivali

Shivali Parab Social Media Post: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम आहे. या कार्यक्रम आणि या कर्यक्रमातील विनोदवीर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. त्यातील एक पात्र कलाकार म्हणजे शिवाली परब.

शिवाली या कार्यक्रमात विविध पात्र साकारते. तिच्या प्रत्येक सादरीकरणातून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. शिवाली जशी कार्यक्रमात सक्रिय आहे तशीच ती सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. नुकताच तिने एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. शिवालीने एका हिंदी जाहिरातीमध्ये काम केले आहे आणि त्याच जाहिरातीचा हा व्हिडिओ आहे.

Shivali Parab Video
Video: इथे एका लग्नाची पंचाईत तर तिकडे दाक्षिणात्य अभिनेत्याने केलं चौथे लग्न; लग्नाचा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क

शिवालीने ही जाहिरात महिंद्रा फायनान्ससाठी केली आहे. एका होतकरू मुलीची कथा या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आली आहे. शिवाली या व्हिडिओमध्ये शिवणकाम करणाऱ्या मुलीच्या भूमिकेत आहे. अनेक योजना आहेत, ज्यांमुळे लघु उद्योगांना गती मिळू शकते, हे या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहे.

शिवालीच्या या व्हिडिओ तिचे वरिष्ठ सहकलाकार समीर चौगुले यांनी कमेंट केली आहे. तर समीर चौगुले यांच्या कमेंटला शिवालीने उत्तर देखील दिले आहे. शिवालीचे चाहते तिच्या पोस्टवर कमेंट करून तिचे अभिनंद करत आहेत.

शिवाली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सह 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' या मालिकेतून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तसेच शिवालीने 'प्रेम प्रथा धुमशान' चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. तसेच शिवाली 'मॅड' केलाय तू ही प्रेमकथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com