Kajol Devgan Statement: 'देशातील नेते सुशिक्षित नसल्यामुळे....'; अभिनेत्री काजोलच्या वक्तव्याने नेटकरी भडकले
Kajol Finally Clarifies Her ‘Uneducated Leaders’ Statement: ‘द ट्रायल’ मुळे चर्चेत आलेल्या काजोलने नुकताच सोशल मीडियावर एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्या विधानामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली. अभिनेत्रीबद्दल ओळख सांगायची तर, ती आपल्या चाहत्यांमध्ये अभिनयाकरिता तर ओळखली जातेच पण, ती आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि आपल्या परखड मतासाठी देखील अभिनेत्री ओळखली जाते.
पण यावेळी, अभिनेत्रीने तिच्या एका वक्तव्यात देशातील नेत्यांना अशिक्षित म्हटले आहे, ज्यावरून एकच खळबळ उडाली आहे. सध्या अभिनेत्री तिच्या कमेंटमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. नुकतंच तिने ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.
दरम्यान, काजोल ‘द ट्रायल’या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर डेब्यू करणार आहे. वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री सध्या बरीच व्यग्र असून तिने मुलाखतीत देशातील राजकारण्यांच्या शिक्षणाबद्दल भाष्य केलं आहे.
‘द क्विंट’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने, देशातील नेत्यांचे शिक्षण आणि त्यांच्या दुरदृष्टीवर भाष्य केले आहे. तिच्या या विधानामुळे सोशल मीडियावर नेटकरी कमालीचे संतापले आहेत. पण नंतर काजोलने आपलं हे विधान मागं घेतलं आहे. मला कोणत्याही राजकीय नेत्याचा अपमान हेतू नव्हता. सोबतच आपल्या देशात अनेक चांगले राजकीय नेते आहेत जे देशाला योग्य मार्गानं नेत आहेत, असं म्हणत तिने यु- टर्न घेतला.
‘द क्विंट’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत काजोलनं म्हटलं, “बदल विशेषतः आपल्या देशात खूपच संथगतीने सुरू आहे. अवघ्या देशाचा विकास खूपच संथगतीने होतोय. कारण आपण सर्वच आपल्या परंपरा आणि विचार करण्याच्या प्रक्रियेत अडकलो आहोत. याचं मुख्य कारण शिक्षण देखील आहे. आपल्या देशात असे अनेक राजकीय नेते आहेत ज्यांची व्यवस्थित शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. त्यातील तर अनेक नेत्यांकडे दूरदृष्टीचं नाही, माझ्या मते, ती दूरदृष्टी आपल्याकडे शिक्षणामुळं येते. शिक्षणच तुम्हाला विविध परिप्रेक्षातून पाहण्याची संधी देते.”
काजोलने ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर, ट्वीटकरत म्हणाली, “मी केवळ शिक्षण आणि त्याच्या महत्वावर बोलत होते. माझा कोणत्याही राजकीय नेत्याला अपमानित करण्याचा हेतू नव्हता. आपल्या देशातील अनेक राजकीय नेते आपल्या देशाला, योग्य मार्गानं नेत आहेत. त्यांचे विचार उत्तम असल्याने आपल्या देशाला ते योग्य मार्गाने नेत आहेत.”
बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगण ‘द ट्रायल’मध्ये झळकणार असून ती या वेबसीरिजमध्ये एका वकिलाची भूमिका साकारणार आहे. अमेरिकन शो असलेल्या ‘द गुड वाईफ’चं हे हिंदी ॲडेप्टेशन आहे. सोबतच काजोलचा ‘लस्ट स्टोरी २’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.