Gautami Patil Marriage Plan: गौतमी पाटील लवकरच लगीनगाठ बांधणार, काय म्हणाली? पाहा VIDEO

Gautami Patil Marriage Plan: गौतमीची तरुणातील क्रेज तिच्या कार्यक्रमात होणाऱ्या गर्दीवरुन लक्षात येतं.
Gautami Patil Marriage
Gautami Patil MarriageSaam TV

Gautami patil marriage plan : गौतमी पाटील म्हटलं की चर्चा तर होणारच. गौतमीचा डान्स, गौतमीची गाणी, गौतमीचे कार्यक्रम आणि गौतमीच्या कार्यक्रमातील गोंधळ सारंकाही नेहमी चर्चेत असतं. यामुळे गौतमी पाटील आज राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. गौतमीची तरुणाईतील क्रेज तिच्या कार्यक्रमात होणाऱ्या गर्दीवरुन लक्षात येते.

मात्र आता गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण तिचा डान्स किंवा कार्यक्रमातील वाद नाही. तर विषय आहे गौतमीच्या लग्नाचा. गौतमी लवकरच लग्न करणार असल्याचं तिनं सांगितलं आहे.

गौतमी पाटीलचा बारामतीत कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर स्थानिक पत्रकारांशी तिने संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी तिला लग्नाबाबत प्रश्न विचारला. यावर गौतमीनेही गमतीने लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं. सर्वांना निमंत्रण देणार असल्याचंही गौतमीने सांगितलं.

Gautami Patil Marriage
Gautami Patil Dance Show: उशीरा आली आणि 'भाव' खाऊन गेली! गौतमी पाटीलविरोधात तक्रार दखल, नेमकं काय आहे प्रकरण?

लग्नातही येऊन तुम्हाला जो काही गोंधळ घालायचा तो घाला, असं गौतमी पाटीलने म्हटलं. गौतमीने लवकरच लग्न करणार म्हटलं खरं पण आता ती नेमकं कधी लग्न करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

गौतमीसह तिघांविरोधात तक्रार

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये गौतमी पाटीलचा शो झाला. बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड मित्र मंडळ या संस्थेने शुक्रवारी 12 मे रोजी गौतमी पाटीलच्या शोचे आयोजन केले होते. या शोचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी गौतमी आणि तिचा सहकारी केतन मारणे आणि सेक्रेटरी विनोद यांच्याविरोधात बार्शी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी गौतमी आणि तिच्या सहकाऱ्याने माझी फसवणूक करुन मानसिक त्रास दिल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com