The Kapil Sharma Show
The Kapil Sharma ShowSaam Tv

The Kapil Sharma Show: कृष्णा अभिषेकने मामा गोविंदाला मारले टोमणे; दोघांमध्ये नेमकं कशावरून बिनसलं? वाचा सविस्तर

नुकतेच शोमध्ये रझा मुराद, गोविंद नामदेव, सयाजी शिंदे, जिमी शेरगिल, अभिमन्यू सिंग आणि इंद्रनील सेनगुप्ता या सेलिब्रिटींनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या शोचा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

The Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा शो’मधील प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकने काही दिवसांपूर्वी ‘द कपिल शर्मा शो’ मधून काढता पाय घेतला होता. प्रेक्षकांकडून त्याच्या कॉमेडीचे नेहमीच कौतुक होत होते. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्याने पुन्हा एकदा शो मध्ये दमदार एन्ट्री केली. ‘सपना’ नावाच्या मुलीचे पात्र साकारत कृष्णाने आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवले.

नुकतेच शोमध्ये रझा मुराद, गोविंद नामदेव, सयाजी शिंदे, जिमी शेरगिल, अभिमन्यू सिंग आणि इंद्रनील सेनगुप्ता या सेलिब्रिटींनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या शोचा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

The Kapil Sharma Show
Maharashtrachi Hasya Jatra: माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं की तुझ्या डोळ्यात.. लग्नाच्या वाढदिवशी नम्रता संभेरावने नवऱ्याला दिल्या खास शुभेच्छा

यावेळी कृष्णा अभिषेकने मामा गोविंदाला अनेक टोमणे मारले. सध्या हे टोमणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावेळी उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींसमोर आणि प्रेक्षकांसमोर कृष्णा आणि गोविंद नामदेवच्या घरातील अनेक वाद प्रेक्षकांसमोर येताना दिसले. दोघेही बरेच दिवस एकमेकांशी बोलत नव्हते. आणि अनेकदा मुलाखतीतही ते एकमेकांविरुद्ध काहीतरी बोलताना दिसले. यावेळी भर कार्यक्रमात कृष्णा अभिषेकने पुन्हा एकदा गोविंदावर निशाणा साधला आहे.

‘द कपिल शर्मा शो’चा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत असून कृष्णा अभिषेक आणि गोविंद नामदेव एकमेकांसोबत बोलत असतात. शोमध्ये कपिल गोविंद नामदेव यांना म्हणतो, ‘बरं झालं तुम्ही गोविंद आहेत. जर गोविंदा असते तर आपल्यामध्ये जास्त संभाषण झालं नसतं.’ हे एकूण गोविंद नामदेवसह कपिल आणि उपस्थित पोट धरून हसू लागले.

The Kapil Sharma Show
Get Together Trailer: पहिल्या प्रेमाची हळवी गोष्ट २६ मे रोजी उलगडणार; देवमाणूस मधील ‘तो’ कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत...

यापूर्वी एकदा गोविंदा त्याच्या पत्नीसोबत ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आला होता, तेव्हा कृष्णाने तो एपिसोड शूट केला नव्हता. मात्र, अनेकवेळा कृष्णानेही गोविंदाला विसरून पुन्हा मिठी मारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नक्की त्यांच्यातील वाद काय आहेत, हे स्पष्ट आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com