Kedar Shinde Post: ही दोस्ती तुटायची नाय! केदार शिंदे यांची मित्रासाठी खास पोस्ट, माझ्या अनंत सुखदुःखात तो...

जुन्या मित्राला भेटल्यानांतर केदार शिंदेंनी एक भावनिक पोस्ट शेअर केली
Kedar Shinde Instagram post
Kedar Shinde Instagram postSaam Tv

Kedar Shinde Emotional Post: मराठी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे केदार शिंदे. त्यांच्या कलाकृती प्रेक्षकांसाठी नेहमीच पर्वणी असते. केदार शिंदे यांच्या नाटक, मालिका आणि चित्रपट प्रेक्षकांना त्याच्या जवळचे वाटतात. सध्या त्यांचा 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपट खूप गाजत आहे.

'महाराष्ट्र शाहीर' हा शाहीर साबळे यांच्यावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानिमित्त केदार शिंदे यांनी टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला भेट दिली. या कार्यक्रमात ते बऱ्याच दिवसांनी अरुण कदम यांना भेटले. जुन्या मित्राला भेटल्यानांतर केदार शिंदेंनी एक भावनिक पोस्ट शेअर केली.

Kedar Shinde Instagram post
Jawan Release Date Out: शाहरुख खानच्या 'जवान'चे नवीन पोस्टर प्रदर्शित; सप्टेंबरमध्ये होणार धमाका

केदार शिंदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'बरेच दिवस झाले या आमच्या मित्राविषयी @ladkadadus अरूण विषयी लिहायचं होतं. पण जमलंच नाही. महाराष्ट्र शाहीरच्या प्रमोशनसाठी #महाराष्ट्राचीहास्यजत्रा मध्ये गेलो होतो. त्यावेळेच्या हा खास फोटो. अरूण आणि माझी मैत्री १९९० पासून. माझ्या अनंत सुखदुःखात तो महत्वपूर्ण भूमिकेत होता. (Latest Entertainment News)

आमच्या सगळ्यांमध्ये लवकर सेटेल होणारा, घसघशीत कमाई करणारा पहिला अरूणच. आर्थिक विवंचना असल्यावर हातात पैसे ठेवणारा अरूणच. कित्येक दिवस मी त्याच्या बीएमसी ॲाफिसात काढले आहेत. त्याच्या जीवावर पोट भरलं आहे. आमच्यात वयाने खुप मोठा पण, त्याची मस्करी करताना ते कधीच डोक्यात येत नाही.

गण गवळण बतावणी आम्ही दोघं लोकधारामध्ये सादर करायचो. त्याच्या डोळ्यात दिसायचं की, पुढचं वाक्य तो विसरला आहे. पण अविर्भाव असा असायचा की, समोरचा वाक्य विसरला आहे. आता आम्ही एकत्र फार काम करत नाही. पण त्याची प्रगती पाहून अभिमान वाटतो. आत्ताच्या पिढीतील मुलांसोबत तो त्याच उर्जेने काम करतो, हे पाहून मन भरून येतं. खुप शुभेच्छा अरूण.

अरुण कदम हे महाराष्ट्राची हास्यजत्रामधील एक जेष्ठ कलाकार आहे. कॉमेडीचा अलग रिदम म्हणजे अरुण कदम, ही त्यांची ओळख आहे. आगरी भाषेतील त्यांचे सादरीकरण प्रेक्षकांचे गेली कित्येक वर्ष मनोरंजन करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com