Kartik Aaryan Video Leaked: कार्तिक आर्यनच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटातील व्हिडिओ लीक, पहिल्याच गाण्यात कार्तिक - कियाराची भन्नाट केमिस्ट्री

Satyaprem Ki Katha Movie : कार्तिक आर्यनच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटातील एक व्हिडिओ लीक झाला आहे.
Kartik Aaryan Video Leaked: कार्तिक आर्यनच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटातील व्हिडिओ लीक, पहिल्याच गाण्यात कार्तिक - कियाराची भन्नाट केमिस्ट्री

Kartik Aryan Dance Video Leaked: अभिनेता कार्तिक आर्यन आणि अबिनेटरी कियारा अडवाणी यांचा 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकनाच्या पसंतीस उतरला होता. आता या चित्रपटाबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटातील एक व्हिडिओ लीक झाला आहे.

कार्तिक आर्यनच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटातील एक व्हिडिओ लीक झाला आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन डान्स करताना दिसत आहे. एका दाक्षिणात्य मंदिराबाहेर करतही डान्स करत आहे.

गोल्डन काठ असलेली सफेद लुंगी, गळ्यात उपरणं घेऊन कार्तिक फुल जोशमध्ये डान्स करत आहे. आय पॉड डायरीज या सोशल मीडिया पेजने त्यांच्या अकाउंटवर ही पोस्ट करत व्हिडिओ लीक झाल्याचे सांगितले आहे.

Kartik Aaryan Video Leaked: कार्तिक आर्यनच्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटातील व्हिडिओ लीक, पहिल्याच गाण्यात कार्तिक - कियाराची भन्नाट केमिस्ट्री
Gadar To Re - Release : सनी देओल- अमिषा पटेल जोडी दिसणार एकत्र, २२ वर्षांनंतर 'गदर: एक प्रेम कथा' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामधील एक गाणे उद्या प्रदर्शित होणार आहे. नसीब से असे गाण्याचे नाव असून हे एक रोमँटिक गाणे आहे. या गाण्याचा टीजर कार्तिकने शेअर केला आहे. यात दोघांची जोडी फार सुंदर दिसत आहे. तसेच रोमंटिक सीन देखील खूप सुंदर आहेत.

कार्तिक आर्यनने फिल्मचे शूटिंग संपल्यानंतर काही फोटो शेअर करत इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. कार्तिकने पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'सत्तू एक खास चित्रपट आणि एक खास व्यक्तिरेखा संपुष्टात आली !!

#SatyaPremKiKatha द्वारे सत्यप्रेम खेळण्याचा हा प्रवास हृदय पिळवटून टाकणारा आणि भावनांची रोलर कोस्टर राईड आहे. सत्यप्रेम हे नेहमीच माझे आवडते, स्टँग आणि धाडसी पात्र असेल आणि मला आशा आहे की तुम्हीही त्याच्याशी संपर्क साधाल, कारण मला विश्वास आहे की आपल्या सर्वांमध्ये सत्तू आहे.'

हा चित्रपट 29 जून 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. कार्तिक आणि कियाराशिवाय या चित्रपटात गजराज राव आणि सुप्रिया पाठक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वी, बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या 'भूल भुलैया 2'मध्ये कार्तिक आणि कियारा यांची जोडी दिसली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com