Kartik Aaryan Upcoming Movie : कार्तिक आर्यन नव्या रोमँटिक भूमिकेसाठी सज्ज ; पोस्ट करत दिली आयकॉनिक चित्रपटाच्या सिक्वेलची हिंट

Kartik Aaryan Share Post : कार्तिक आर्यन त्याच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाला आहे.
Kartik Aaryan Buys New House
Kartik Aaryan Buys New HouseInstagram @kartikaaryan

Kartik Aaryan Gave Hint Of Aashiqui 3 : अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या सत्यप्रेम की कथाच्या चित्रपटाच्या यशाचा आनंद चाखत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. सत्यप्रेम की कथा या चित्रपटाने १०० कोटीचा गल्ला देखील पार केला आहे. आता कार्तिक आर्यन त्याच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाला आहे.

कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक लेटेस्ट पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्याने स्वतःचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये कार्तिक आर्यन काळ्या जाळीदार शर्टमध्ये पोज देताना दिसत आहे. (Latest Entertainment News)

Kartik Aaryan Buys New House
HBD Bhumi Pednekar : बिनधास्त भूमी पेडणेकरच्या खऱ्या आयुष्यतील काही Unknown Stories, जाणून घ्या

कार्तिक पोस्टमध्ये काय म्हणाला?

कार्तिक आर्यनने पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याच्या पुढील प्रोजेक्टचे संकेत दिले आहेत. त्याने लिहिले, "माझ्या पुढच्या रोमँटिक चित्रपटाची वाट पाहत आहात, कोणती असेल ?"

कार्तिक आर्यनने ही पोस्ट शेअर करताच ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. कमेंटमध्ये चाहत्यांनी त्याचा आगामी चित्रपटाचा अंदाज लावण्यास सुरुवात केली. तसेच वेगवगेळ्या चित्रपटाची नावं सजेस्ट केली.

तर कार्तिकने आशिकी 3 बद्दल एक अपडेट शेअर केला आहे. त्याचबरोबर काही लोकांनी चित्रपटातील नायिकेबाबत देखील मत मांडले आहे. या यादीतील बहुतांश युजर्सनी त्यांची पहिली पसंती कियारा अडवाणी दिली.

Kartik Aaryan Buys New House
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Update : दयासाठी जेठालालच्या डोळ्यात पाणी... तारक मेहता...मध्ये लवकरच परतणार अभिनेत्री

आता आशिकी चित्रपटाविषयी सकारात्मक चर्चा करायला हरकत नाही. करत कियारा आणि क्रितीची चर्चा कमेंटमध्ये नेटकरी करत आहेत. दरम्यान या कमेंट्समध्ये एक कमेंटने लक्ष वेधून घेतले आहे. ही कमेंट आहे सत्यप्रेम की कथा चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वंस याची. त्यांनी हात वर करून सहमती दर्शवणारी ईमोजी शेअर केला आहे. त्यामुळे या देखील चित्रपटाचे दिगदर्शन समीर विद्वंस करणार असे प्रथमदर्शी लक्षात येत आहे.

सत्यप्रेम की कथा कलेक्शन

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट 29 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सत्यप्रेम की कथाने आतापर्यंत १०० कोटींचा व्यवसाय केला आहे.

चित्रपटाची स्टार कास्ट

सत्यप्रेमच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्यासह सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रांदेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत आणि शिखा तलसानिया यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com