Kartik Aaryan Upcoming Movie: अभिनेता कार्तिक आर्यनने हा बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक दिग्गज कलाकारांचे चित्रपटप बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरले. पण जेव्हा अनेक बड्या कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फेल ठरत होते तेव्हाही कार्तिक आर्यन हिट ठरला होता. कार्तिक आर्यन आणखी एक हिट चित्रपट घेऊन आपल्या भेटीला येणार आहे.
अभिनेता कार्तिक आर्यन अक्षय कुमारला रिप्लेस करणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यानापासून होती. अक्षय कुमारच्या 'भूल भुलैया' चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कार्तिकने अक्षय कुमारचीजागा घेतली. तर हेरा फेरीच्या तिसऱ्या भागात देखील कार्तिक आर्यनला अक्षय कुमारच्या जागी कास्ट करणार असल्याची चर्चा होती.
कार्तिक आर्यन अक्षय कुमारच्या चित्रपटाचे सिक्वेल असलेल्या चित्रपटामध्ये काम करणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. कार्तिक आर्यनने नुकतीच त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कार्तिकने एक फोटो शेअर केला आहे. कार्तिकने पोलीस आयडीचा फोटो शेअर केला त्यावर त्याचा फोटो आहे.
तसेच त्या पोलीस आयडीवर लिहिले आहे प्रोटीन पोलीस. कार्तिक आर्यन, स्पेशल एजेंट. तसेच दुसऱ्या बाजूला लिहिले आहे, प्रोटीन चोरणे म्हणजे नो चीटिंग. याशिवाय कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'पुढील मिशनसाठी मी सज्ज आहे. #प्रोटीनपोलीस'.
कार्तिकच्या पोस्टवरून तो एक स्पेशल एजेंटच्या भूमिके आहे हे स्पष्ट झाले. तर त्याच्या चित्रपट कॉमेडी असणार आहे हे त्याने शेअर केलेल्या फोटोवरून लक्षात येत आहे. कार्तिकच्या या आगामी मिशनसाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. तसेच त्याचे अभिनंदन देखील करत आहेत.
'शहजादा' चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. आता आगामी चित्रपटामध्ये कार्तिक काय धमाल करणार, या चित्रपटाची कथा काय असणार, त्याचीसोयाबीत कोणती अभिनेत्री असणार असे प्रश्न त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना पडले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.