Chandramukhi 2 Released Date Out
Chandramukhi 2 Released Date OutInstagram @kanganaranaut

Chandramukhi 2 Release Date Out : कंगना रनौतच्या 'चंद्रमुखी 2' रिलीज डेट जाहीर ; 5 भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Kangana Ranaut Movie : 'चंद्रमुखी २' हा दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'चंदमुखी' चित्रपटाचा सीक्वेल असणार आहे.
Published on

Kangana announces Chandramukhi 2 release date : कंगना रनौत ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. कंगना नेहमीच कोणत्या ना कोणत्या वाद अडकलेली असते. 'टीकू वेड्स शेरू' चित्रपटामुळे कंगना सध्या चर्चेत आहे. कंगनाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कंगना लवकरच 'चंद्रमुखी २' चित्रपटात दिसणार आहे. तर आता या चित्रपटाचा प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे.

'चंद्रमुखी २' हा दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'चंदमुखी' चित्रपटाचा सीक्वेल असणार आहे. रजनीकांत यांच्या 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे कंगना अभिनित 'चंद्रमुखी २' ची उत्सुकता वाढली आहे. (Latest Entertainment News)

Chandramukhi 2 Released Date Out
Rukhsar Rehman-Faruk Kabir Divorce : हा निर्णय अजिबात सोपा नाही... रुखसार रहमानचा लग्नाच्या १३ वर्षांनी घेणार घटस्फोट

या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रेक्षक आता चित्रपटाच्या कथेविषयी आणून घेण्यास उत्सुक आहेत. या दरम्यान चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. पी. वासू दिग्दर्शित 'चंद्रमुखी २' चित्रपटात कंगना रनौत आणि राघव लॉरेन्स प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'चंद्रमुखी २' चित्रपट १९ सप्टेंबर २०२३ रोजी गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे.

कंगना रनौत सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिने नुकतचं सोशल मीडियावरुन चंद्रमुखी २ चित्रपटाचं पोस्टर शेअर केले आहे. कंगनाच्या या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढली आहे. 'ती सप्टेंबरमध्ये परत येत आहे...तुम्ही तयार आहात का?'असं कॅप्शनमध्ये लिहून चित्रपटाची तारिख जाहीर केली आहे. कंगनाचा 'चंद्रमुखी २' चित्रपट तमिळ, हिंदी, तेलुगू, मल्ल्याळम, कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, कंगना रनौत निर्मित 'टीकू वेड्स शेरु' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. कंगनाच्या निर्मितीचा हा पहिला चित्रपट असून या चित्रपटावर तुफान टीका होता आहे.

कंगनाचा मुख्य भूमिकेतला 'इमरजन्सी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाचा इमरजन्सी चित्रपट हा इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. कंगनाने याचे दिग्दर्शन देखील केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com