Taraka Ratna in Coma: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक, रॅलीमध्ये चालताना अचानक हरपली शुद्ध...

ज्युनियर एनटीआरचा चुलत भाऊ आणि अभिनेता नंदामुरी तारकारत्न याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
Taaraka Ratna
Taaraka RatnaSaam TV
Published On

Taraka Ratna in Coma: ज्युनियर एनटीआरचा चुलत भाऊ आणि अभिनेता नंदामुरी तारकारत्न याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडेच एका पदयात्रेदरम्यान नंदामुरीला हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तारक रत्नबाबत समोर आलेल्या हेल्थ अपडेटनुसार, तो कोमामध्ये गेला आहे. परिणामी अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक आहे.

Taaraka Ratna
Rakhi Sawant Mother Death: राखीच्या आईच्या निधनानंतर बॉलिवूड शोकाकूल; 'या' सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

सध्या नंदमुरी कोमामध्ये असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अभिनेत्याला रुग्णालयात भेटण्यासाठी पाहुणे आणि चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. नंदामुरी कुटुंबातील अनेक सदस्य रुग्णालयात आहेत, तर अनेक राजकारणी देखील अभिनेत्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हजर झाले होते. सोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहतेही प्रकृतीविषयी प्रार्थना करीत आहे.

Taaraka Ratna
Kangana Ranaut: 'पठान'ला खडेबोल सुनावणाऱ्या कंगनाला नेटकऱ्याने झापलं, 'कंगना तुझ्या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी...'

तारकारत्न यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कुटुंबीय आणि नातेवाईक बंगळुरू येथील नारायण हृदयालय रुग्णालयात पोहोचले आहेत. ज्युनियर एनटीआर आणि कल्याण राम यांचे कुटुंबीयही रुग्णालयात दाखल झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तारकची प्रकृती अजूनही गंभीर आहे. तो कोमात आहे. सोमवारपर्यंत तारकच्या प्रकृतीविषयीची अपडेटेड माहिती डॉक्टरांकडून येण्याची अपेक्षा आहे.

Taaraka Ratna
Rakhi Sawant: शेवटच्या क्षणी राखीच्या आईला असह्य वेदना, व्हिडिओ पाहून चाहत्यांचेही डोळे पाणावले...

नंदामुरी तारकारत्न 'RRR' फेम ज्युनियर एनटीआर आणि कल्याण राम यांचे चुलत भाऊ आहे. अभिनेता आणि आंध्र प्रदेश (युनायटेड)चे माजी मुख्यमंत्री नंदामुरी तारका रामा राव यांचा नातू आहे. तर नंदामुरी बालकृष्ण आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नारा चंद्राबाबू नायडू यांचा भाचा आहे.

नुकतेच तारकारत्नचा चुलत भाऊ नारा लोकेशसोबत एका रॅलीत दिसला होता. येथील पदयात्रेदरम्यान ते अचानक बेशुद्ध पडले. गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत त्याचा जीव गुदमरल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com