ॲटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ची सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशातही चित्रपटाची कमाल चर्चा सुरू आहे. चित्रपटाने आतापर्यंत एकूण ७३५.०२ कोटींचा जगभरामध्ये आकडा गाठला आहे. तर लवकरच भारतातही ॲटली कुमारचा ‘जवान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा पल्ला गाठणार आहे. जवानच्या भरघोस यशानंतर दिग्दर्शक ॲटली कुमार सलमान खान आणि हृतिक रोशनला घेऊन चित्रपट बनवण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे.
ॲटली कुमारने आतापर्यंत अनेक साऊथ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याने ‘जवान’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यु केलं आहे. नुकतंच पिंकव्हिलासोबत बोलताना दिग्दर्शक ॲटली कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाविषयी सांगितले आहे. ॲटली आता ‘जवान’नंतर बॉलिवूडमध्ये आणखीन एक नवीन चित्रपट बनवणार असल्याचे सांगितले आहे. नवीन चित्रपटासाठी ॲटली बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींसोबत बोलत असल्याची माहिती देखील मिळाली आहे. (Bollywood Actor)
नवीन चित्रपटाबद्दल पिंकव्हिलासोबत बोलताना दिग्दर्शकाने माहिती दिली की, “मी वेळोवेळी अनेक सिनेप्रेमींसोबत चित्रपटाच्या कथेसह अनेक गोष्टींवर चर्चा करत असतो. मी आतापर्यंत सलमान खान, हृतिक रोशन, रणवीर सिंग, रणबीर कपूर, विजय थलपथी आणि अल्लू अर्जुन सोबत चित्रपटाविषयी बोललो आहे. आम्ही सिनेप्रेमी असल्यामुळे एकाच गोष्टीला चिकटून राहत नाहीत.” (Bollywood Film)
ॲटली कुमार चित्रपटाविषयी पुढे म्हणाला, “ होय, आम्ही लवकरच सर्व कलाकार एकत्र येण्याच्या विचारात आहेत. आम्ही एकत्र एका चित्रपटामध्ये काम करणार आहोत. एकदा का देवाचा आशीर्वाद मिळाला की, चित्रपटाच्या पुढच्या कामाला सुरूवात होईल. त्यामुळे मला त्यांच्यासोबत काम करायला फार आवडेल. सोबतच आमच्या सर्वांमध्ये ताळमेळ आहे, आपल्याला फक्त देवाचे आशीर्वाद आणि चांगली कथा स्क्रिप्ट हवी आहे, हे सर्व उपलब्ध झाले की, चित्रपटाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. ” (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.