
सुकमा, छत्तीसगड - सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. दोन वर्षांपुर्वीचा एक व्हिडिओ (viral video) आता अचानक व्हायरल झालाय. या व्हिडिओत एक शाळकरी मुलगा शाळेच्या गणवेशात गाणं म्हणतोय. ''जाने मेरी जानेमन बचपन का प्यार मुझे भूल नही जाना रे'' (jaane meri janeman, bachpan ka pyar) असे या गाण्याचे बोल असून हा व्हिडिओ अवघ्या ३० सेकंदांचा आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध रॅपर बादशहाने (singer badshah) या मुलाला सोबत एक गाणं रेकॉर्ड करण्याची ऑफर दिली आहे. (jane meri janeman viral video, badshah offers song to sahadev)
सहदेव (sahadev) छत्तीसगडच्या सुकमा (sukma) जिल्ह्यातील दिरदो छिंदगढ ब्लॉकच्या उरमापाल या गावात राहतो. दोन वर्षांपुर्वी तो पाचवीला असताना त्याने वर्गात हे गाणं शिक्षकांसमोर गायलं होतं. त्याच्या शिक्षकांनी सहज गंमत म्हणून हा व्हिडिओ युट्यूबवर टाकला होता. मात्र आता दोन वर्षांनी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो रातोरात प्रसिद्ध झाला आणि त्याला थेट बादशहाने व्हिडिओ कॉल करुन चंदीगढला (chandigad) भेटायला बोलावले आहे.
हे देखील पहा -
सहदेवला घेऊन एक सोलो सॉंग तयार करण्यासाठी बादशहाची क्रिएटीव्ह टीम कामाला देखील लागल्याचं बोललं जातंय. सोशल मीडियावर या व्हिडिओला आतापर्यंत ९० लाख वेळा बघीतलं गेलं आहे. अनेकजण या व्हिडिओसोबत स्वतःचा व्हिडिओ जोडून रील्स बनवतायत. तर काहींनी याचे रिमीक्स गाणे तयार केले आहे. येणाऱ्या काही दिवसांत आपल्याला सहदेवचा नवीन व्हिडिओ पहायला मिळू शकतो.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.