मुंबई: तामिळनाडूमधील (Tamilnadu) सत्य घटनेवर आधारित चित्रपट जय भिम (Jai Bhi movie) आज अॅमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) रिलीज करण्यात आली आहे. साऊथचा सुपरस्टार सुर्या सिवकुमारची (Suriya Sivakumar) मुख्य भुमिका असलेला हा चित्रपट तमिल, तेलुगु, हिंदी, कन्नड़ आणि मलयालम या पाच भाषांमध्ये प्रदर्शीत झाला आहे. तमिळनाडूमध्ये ९० च्या दशकात झालेल्या दलितांवरील अत्याचाराबाबत हा चित्रपट आहे. यात सुर्या वकिलाच्या भुमिकेत असून चित्रपटाचा बहुतांश भाग कोर्टरुम ड्रामावर आधारित आहे. (Jai Bhim: Film based on Dalit atrocities "Jai Bhim" released in five languages )
पहा ट्रेलर-
जय भिम चित्रपटाचं दिग्दर्शन टी. जे. ज्ञानवेल यांनी केलं असून सूर्यासह, प्रकाश राज, राव रमेश, रजीशा विजयन, मणिकंदन आणि लीजोमोल जोस यांसारखे कलाकार आहेत. एकुण २ तास ४५ मिनिटांची ही फिल्म असून या फिल्मला आयएमडीबीने ९.७ रेटींग दिली आहे. ही एक वैचारिक फिल्म असून यात साऊथचा सुपरस्टार सुर्या सिवकुमार मुख्य भुमिकेत असल्याने ही फिल्म चांगलीच चर्चेत आहे. तामिळनाडूमध्ये १९९५ साली घडलेल्या एका सत्य घटनेवर ही फिल्म आहे. यात एका आदिवासी कुटुंबातील व्यक्तींचा पोलिसांनी केलेला छळ आणि त्यांना न्याय देण्यासाठी सुर्याची लढाई असा स्वरुपाचा हा चित्रपट आहे.
जय भिम चित्रपटात जातीवर आधारित भेदभावाचा मुद्दा अतिशय गांभीर्याने दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर फक्त सुर्याच नाही तर इतर सर्व पात्रांनीही चांगला अभिनय केला आहे. चित्रपटात असे अनेक सीन्स आहेत जे तुम्हाला विचार करायला लावतील. कधी कधी देशात लोकशाही वाचवण्यासाठी हुकूमशाहीचीही गरज भासते' आणि 'कायदा आंधळा आहे, आज जर हे न्यायालय मुके झाले तर मुश्किल होईल', असे काही संवाद आणि दृश्य चित्रपटाला अधिक खास बनवतात. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच पाहता येईल.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.