Jackie Shroff's wife Ayesha Shroff Fraud Case: अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफ हिने सांताक्रूझ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशा श्रॉफने तक्रारीत तिची ५८.५३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगितले आहे.
आरोपी अॅनल फर्नाडिसने तिची फसवणूक केल्याचा दावा आयशाने केला आहे. या प्रकरणी आरोपी अॅनल फर्नाडिस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अॅलन फर्नांडिसवर भादंवि कलम ४२०, ४०८, ४६५, ४६७ आणि ४६८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. (Latest Entertainment News)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅलन यांची एमएमए मॅट्रिक्स कंपनीमध्ये 2018 मध्ये डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. एमएमए मॅट्रिक्स जिम टायगर श्रॉफ आहे. टायगर श्रॉफ चित्रपटाच्या कामामध्ये व्यस्त असल्याने त्याची आई आयशा त्याची कंपनी सांभाळते.
भारतात आणि भारताबाहेर 11 टूर्नामेंट आयोजित करण्यासाठी आरोपींनी खूप पैसे घेतल्याचे बोलले जात आहे. यामध्ये डिसेंबर 2018 ते जानेवारी 2023 पर्यंत कंपनीच्या बँक खात्यात 58,53,591 रुपये शुल्क म्हणून जमा करण्यात आले. मात्र, आयशा श्रॉफच्या बाजूने अद्याप याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.
आयशा श्रॉफचा अभिनेता आणि इन्फ्लुएन्सर साहिल खानसोबतही पैशांवरून वाद झाला आहे. 2015 मध्ये आयशा श्रॉफने साहिल खानविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी धमकीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. 4 कोटी रुपयांचे हे प्रकरण नंतर परस्पर वाटाघाटीद्वारे निकाली काढण्यात आले आणि एफआयआर रद्द करण्यात आली.
विशेष म्हणजे, आयशा श्रॉफ तिच्या काळातील अभिनेत्री आणि मॉडेल होती. लहान वयातच तो जॅकी श्रॉफच्या प्रेमात पडला आणि दोघांनी लग्न केले. लग्नानंतर आयशाने अभिनयापासून दूर गेली. आयशाने नंतर निर्माती म्हणूनही काम केले आणि अनेक चित्रपटांची निर्मिती केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.